iPhone 13 : शानदार ऑफर!! iPhone 13 वर मिळत आहे आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत, 30000 रुपयात खरेदीची संधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 13 : Apple या आघाडीच्या टेक कंपनीने काही दिवसांपूर्वी iPhone 13 हा फोन लाँच केला होता. कंपनीने हा फोन 69,900 रुपयांमध्ये सादर केला होता. अनेकांना हा फोन खरेदी करायचा होता परंतु, किंमत जास्त असल्यामुळे त्यांना तो विकत घेता आला नाही.

मात्र तुम्ही आता तो खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. कारण या फोनवर फ्लिपकार्टवर सवलत दिली जात आहे. 30000 रुपयांमध्ये तुम्ही हा फोन विकत घेऊ शकता. या फोनवर काय सवलत आहे? कधीपर्यंत ही सवलत असणार आहे? ते जाणून घ्या.

मिळत आहे 30,000 रुपयांपर्यंतची शानदार एक्सचेंज ऑफर

फ्लिपकार्टवर फोनची या फोनची मूळ किंमत 69,900 रुपये इतकी आहे. परंतु,सध्या या फोनवर 10% म्हणजेच 7,651 रुपयांची मोठी सवलत मिळत आहे. त्यामुळे या सवलतीनंतर, iPhone 13 फ्लिपकार्टवर 62,249 रुपयांना लिस्ट झाला आहे. तर दुसरीकडे, तुम्हाला HDFC बँकेच्या कार्डने व्यवहार करण्यासाठी एकूण 2,000 रुपयांची सवलत देण्यात येत आहे. इतकेच नाही तर या डीलमध्ये जुन्या फोनच्या बदल्यात 30,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही उपलब्ध असणार आहे.

किती असणार या फोनची किंमत

हे लक्षात ठेवा की, जुन्या फोनसाठी एक्सचेंज ऑफर तुमच्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे. त्याच वेळी, जर एकदा तुम्ही तुमचा पिनकोड टाकला तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रात एक्सचेंज ऑफरचा लाभ उपलब्ध असणार आहे की नाही हे तुम्ही तपासले पाहिजे. या सर्व ऑफर्सनंतर, तुमच्या फोनची किंमत 30,249 रुपये (69,900-7,651-2,000-30,000) इतकी होईल.

A15 बायोनिक चिपसेटने सुसज्ज असणार फोन

iPhone 13 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले कंपनीने दिला आहे. तर त्याच वेळी, कंपनीच्या या फोनचा प्रोसेसर A15 बायोनिक चिपसेटने सुसज्ज असणार आहे. स्टोरेजचा विचार केला तर यात 128GB रॅम स्टोरेज आहे. तसेच या फोनमध्ये 12MP प्राथमिक कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा वाइड लेन्स दिली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा दिला जात असून हा फोन मिडनाईट कलरमध्ये उपलब्ध आहे.