सिबिल स्कोर तपासणे इतके धोकादायक आहे का ? पुण्यातील ह्या घटनेने खळबळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Crime News : सिबिल स्कोर चेक करण्याच्या बहाण्याने कागदपत्रे घेऊन त्याद्वारे तीन मोबाईल फोन खरेदी करत तरुणाची सव्वा लाखाची फसवणूक केली. या प्रकरणी सोमवारी (दि.२४) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विकास भास्कर चौतमाल (वय ३०, रा. साखरे वस्ती, हिंजवडी. मूळ रा. संभाजीनगर ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश विष्णू पाडाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १९ मार्च ते २४ जुलै या कालावधीत हिंजवडी येथे घडली. फिर्यादी यांना त्यांचा सिबिल स्कोर चेक करायचा होता. त्यासाठी त्यांनी आरोपीशी संपर्क केला.आरोपीने फिर्यादी यांचा विश्‍वास संपादन करून त्यांच्याकडून कागदपत्रे घेत त्या आधारे एक मोबाईल फोन खरेदी केला.

खरेदी केलेला मोबाईल रद्द करतो असे सांगून आणखी दोन मोबाईल फोन खरेदी केले. यामध्ये फिर्यादी यांची एक लाख २३ हजार ९८८ रुपयांची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.