एकत्र येण्याचे ठरले आहे, पण पुढचे भविष्य आताच कसे सांगता येईल ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- राष्ट्रवादी आणि शिवसनेने आघाडी करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच झालेला आहे. महापाैरपद शिवसेनेला तर उपमहापाैरपद राष्ट्रवादीला असे ठरले आहे. 

काँग्रेसचा निर्णय मी सांगू शकत नाही, पण ते बरोबर आलेच तर त्यांचेही स्वागत असणार आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केले.

महापाैर बाबासाहेब वाकळे यांच्या अडीच वर्षांच्या कामाचा आढावा व सत्कार सोहळ्यानंतर आमदार जगताप पत्रकारांशी बोलत होते.

जगताप म्हणाले, महापाैर निवडणुकीबाबत आमची समन्वय समिती व शिवसेना नगरसेवकांत चर्चा झालेली आहे. ही चर्चा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी केली आहे.

शिवसेनेला पाठिंबा देण्याचे वरिष्ठ पातळीवरच ठरले आहे. उपमहापाैरपद राष्ट्रवादीकडे असणार आहे, पण उपमहापाैर पदी कोण असेल, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच घेतला जाईल.

एकत्र येण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर नव्हे, तर वरिष्ठपातळीवरच झाला आहे. महाआघाडीत काँग्रेसचा निर्णय मी सांगू शकत नाही, ते बरोबर आले तर त्यांचे स्वागत आहे.

बरोबर घेतले तर त्या भागातील विकासाला चालनाच मिळते. काँग्रेसलाही सत्तेत स्थान मिळू शकते, पण याबाबत पुढील वाटाघाटीतच चर्चा होईल.

अडीच वर्षांसाठी एकत्र येण्याचे ठरले आहे, पण पुढचे भविष्य आताच कसे सांगता येईल ?, असेही आमदार जगताप म्हणाले.