file photo

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- जागेची मोजणी सुरू असताना जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी केल्याबद्दल तिघांवर शहर पोलिसांनी शनिवारी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला.

ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजता शहरातील चैतन्यनगर येथे घडली. या घटनेने उलट-सुलट चर्चेला उधाण आले.जया राहुल डोळस (४८, चैतन्यनगर) व त्यांचा भाऊ दलित पँथरचे शहराध्यक्ष राजू यादव खरात हे जागेची मोजणी करत असता दशरथ बबन सातपुते, योगेश दशरथ सातपुते,

शीतल दशरथ सातपुते (मालदाड रोड) यांनी अडवणूक करत, जागेच्या मोजणीस विरोध केला. डोळस यांना जातिवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.

वाद वाढू नये, यासाठी त्यांनी शहर पोलिस स्टेशन गाठले. डोळस यांच्या फिर्यादीवरून तिघांवर शहर पोलिसांनी दोन दिवसानंतर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. या घटनेची पोलिस उपअधीक्षक राहुल मदने शहानिशा करत आहेत.