ताज्या बातम्या

Jeep : स्वस्तात मस्त! थेट 2.35 लाखांनी कमी झाल्या ‘या’ कारच्या किमती; मिळते शानदार मायलेज आणि लुक

Published by
Ahmednagarlive24 Office

Jeep : 1 एप्रिलपासून BS6 फेज-II निकष लागू झाले आहेत. त्यामुळे मारुती, टाटा, ह्युंदाई यांसारख्या अनेक दिग्ग्ज कंपन्यांच्या कारच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. या निर्णयामुळे कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहे.

परंतु असे असूनही तुम्ही स्वस्तात कार खरेदी करू शकता. कारण जीप ही कंपनी स्वस्तात कारची विक्री करत आहे. या कंपनीच्या लोकप्रिय कंपास आणि मेरिडियन या दोन्ही कारच्या किमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे तुमची लाखो रुपयांची बचत होऊ शकते.

प्रीमियम सेगमेंटमध्ये या गाड्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे या गाड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या दोन्ही कार BS6 फेज-2 नियमांनुसार अपडेट केल्या आहेत. जीप मेरिडियन ही एक प्रीमियम कार असून जी सुरक्षितता, मायलेज आणि पॉवरमध्ये सर्वोत्कृष्ट आहे. आता या कारची किंमत 2.35 लाख रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

सध्याच्या किमतीच्या तुलनेत 7.81% ची किंमत कमी झाली आहे. एवढेच नाही तर जीप कंपासच्या बेस स्पोर्ट पेट्रोल व्हेरियंटच्या किमतीतही 1.08 लाख रुपयांची कपात झाली आहे. खरेदीदारांना जीप कंपासमध्ये पेट्रोल आणि डिझेल असे 2 पर्याय मिळतात. परंतु, ज्यांना मेरिडियन खरेदी करायचे आहे त्यांना फक्त डिझेलचा पर्याय मिळत आहे.

Ahmednagarlive24 Office