Jio 5G Service : बिनधास्त चालवा इंटरनेट ! ‘या’ शहरात जिओ देणार फ्रीमध्ये 5G सेवा; असा मिळेल अनलिमिटेड डेटाचा लाभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio 5G Service :देशात आता रिलायन्स जिओचे  5G सेवांचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आता जिओने आपली 5G सेवा आणखी चार शहरात सुरु केली आहे. यामुळे आता जिओ 5G देशातील तब्बल  72 शहरांमध्ये उपलब्ध झाला आहे.

जिओने आता  ग्लावेर, जबलपूर, लुधियाना आणि सिलीगुडी या शहरात आपली 5G सेवा सुरु केली आहे.  आम्ही तुम्हाला सांगतो या पूर्वी देखील जिओने 11 शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली होती. यामध्ये लखनौ, त्रिवेंद्रम, म्हैसूर, नाशिक, औरंगाबाद आणि चंदीगडचा समावेश होता. त्याचवेळी मोहाली, पंचकुला, जिरकपूर, खरड आणि डेराबस्सीचा समावेश होता.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि जिओने पहिल्यांदाच एकाच वेळी अनेक राज्यांमध्ये 5G सेवा सुरु केली आहे तसेच जिओने काही दिवसापूर्वी संपूर्ण गुजरात राज्यात 5G सेवा सुरु केली होती. राज्यातील सर्व 33 जिल्ह्यांमध्ये 5G सुरु झाल्याने गुजरात हे देशातील पहिले राज्य ठरले आहे जेथे संपूर्ण राज्यात 5G सेवा उपलब्ध आहे.

आज ग्लावेर, जबलपूर, लुधियाना आणि सिलीगुडी या चार शहरात आपली 5G सेवा सुरु करताना जिओने सांगितले कि या शहरांमधील त्यांच्या वापरकर्त्यांना जिओ वेलकम ऑफरसाठी आमंत्रित केले जाईल. या अंतर्गत, वापरकर्त्यांना 1 Gbps अधिक स्पीडसह अमर्यादित डेटाचा लाभ मिळेल.

Reliance Jio
 

ही ऑफर आजपासून सुरू होत आहे. लाँचच्या वेळी बोलताना जिओच्या प्रवक्त्याने सांगितले की, आणखी चार शहरांमध्ये Jio True 5G सेवा सुरू करताना त्यांना आनंद होत आहे. ते म्हणाले की Jio मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि पंजाबमधील वापरकर्त्यांसाठी पसंतीचे ऑपरेटर आहे आणि सर्वात लोकप्रिय तंत्रज्ञान ब्रँड आहे आणि हे लाँच Jio ची लोकांशी बांधिलकी दर्शवते.

हे पण वाचा :- iPhone Offers : ग्राहकांची मजा ! आता होणार पूर्ण 32 हजारांची बचत ; ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा नवीन आयफोन