file photo

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- टपाल जीवन विमा योजना व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेंतर्गत असणाऱ्या विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची वरिष्ठ अधीक्षक डाकघर, अहमदनगर विभाग, अहमदनगर यांचे मार्फत थेट नियुक्ती केली जाणार आहे.

नमूद केलेल्या अटींची पूर्तता असणा-या उमेदवारांनी वरिष्ठ अधीक्षक डाकघर, अहमदनगर विभाग, अहमदनगर यांच्या कार्यालयास १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत मुलाखतीस उपस्थित रहावे. उमेदवार हा १२ वी पास असणे आवश्यक आहे. त्याची वयोमर्यादा १८ ते ६० असणे आवश्यक आहे.

उमेदवार हा कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी, माजी जीवन सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, स्वयंसेवी संघटना चालक, माजी सैनिक, निवृत्त शिक्षक, बेरोजगार, स्वयेरोजगार असणारे तरुण किंवा तरुणी वरील पात्रता असणारे इच्छुक उमेदवार मुलाखतीस उपस्थित राहू शकतात.

इच्छुक उमेदवारांनी विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची पूर्णत: माहिती असणे अपेक्षित आहे.

मुलाखतीस येताना उमेदवाराने आवश्यक कागद पत्रे- जन्म तारखेचा दाखला, शैक्षणिक पात्रता, आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक, ई मेल आय डी व इतर आवश्यक कागद पत्रे घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.