अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर परिस्थिती बिघडत आहे. अफगाणिस्तानमध्ये काबुल येथे चार दिवसानंतर पुन्हा स्फोट झाला आहे.

याआधी गुरुवार २६ ऑगस्ट रोजी काबुलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एक बॅरन हॉटेल आणि विमानतळाचे गेट यांच्या दरम्यान एक असे दोन स्फोट झाले होते. या घटनेनंतर आज पुन्हा काबुलमध्ये दुसरा स्फोट झाला. काबूल विमानतळाजवळ रविवारी आणखी तीन बॉम्बस्फोट झाले.

स्फोटाच्या ठिकाणावरून धुराचे लोट दिसू शकतात. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूचे लोक घाबरून आले. हा हल्ला रॉकेटच्या माध्यमातून झाल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.

दरम्यान अफगाणिस्तानमधील काबुल विमानतळावर आणखी एका आत्मघातकी हल्ल्याची शक्यता असल्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी शनिवारी दिला होता.

पुढील ७२ तासांच्या आत हल्ला होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले होते. त्यामुळे जो बायडन यांचा अंदाज खरा ठरला आहे. यापूर्वी 26 ऑगस्ट रोजी काबूल विमानतळाजवळ झालेल्या हल्ल्यात सुमारे 103 लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 90 अफगाण नागरिक आणि 13 अमेरिकन सैनिकांचा समावेश आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, हल्ल्यात मारल्या गेलेल्या 90 अफगाणींमध्ये 28 तालिबान होते. हे सर्व तालिबानी विमानतळाबाहेर सुरक्षेत उभे होते. या हल्ल्यात जखमींची संख्या 1300 च्या वर गेली असल्याचे सांगण्यात येत आहे.