Kanda Bajarbhav : खुशखबर ! कांदा कडाडला ; आज ‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळाला तब्बल 5 हजाराचा भाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanda Bajarbhav : दिवाळीच्या पर्वावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, आज कांद्याच्या बाजारभावात चांगलीच सुधारणा पाहायला मिळाली आहे.

आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मित्रांनो खरे पाहता गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याला अतिशय कवडीमोल बाजार भाव मिळत होता. मात्र दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर कांद्याची मागणी वाढली असून कांद्याचा बाजारभावात देखील मोठी सुधारणा पाहायला मिळत आहे.

दरम्यान कांद्याला किरकोळ बाजारात 40 रुपये प्रति किलोपर्यंत बाजारभाव मिळत असल्याने आणि भविष्यात यामध्ये अजून दहा ते पंधरा रुपये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता केंद्र शासनाने बफर स्टॉक मधील कांदा आता खुल्या बाजारात विक्री साठी पाठवला आहे.

केंद्र शासनाने राज्यांना तब्बल 54 हजार टन कांदा पाठवला आहे. जाणकार लोकांनी केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे घाऊक बाजारात कांद्याच्या किमती कमालीच्या कमी होतील अशी अशांका वर्तवली होती. मात्र अद्याप तरी कांद्याच्या किमती कमी होत नसल्याचे चित्र आहे.

एवढेच नाही तर कांद्याच्या बाजारभावात आधीपेक्षा दुपटीने वाढ होतं आहे. आज सोलापूर एपीएमसीमध्ये पांढऱ्या कांद्याला तब्बल पाच हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा कमाल बाजार भाव मिळाला असल्याने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना भविष्यात कांद्याच्या दरात अजून सुधारणा होण्याची आशा आहे.

मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच कांद्याच्या बाजार भावाची माहिती जाणून घेत असतो आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेल्या कांदा बाजार भावाची चर्चा करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
27/10/2022
कोल्हापूर क्विंटल 1713 700 2800 1600
औरंगाबाद क्विंटल 948 300 2500 1400
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 4815 1700 2700 2200
खेड-चाकण क्विंटल 300 1000 2500 1300
सातारा क्विंटल 108 1800 2400 2100
सोलापूर लाल क्विंटल 5512 100 3500 1600
पंढरपूर लाल क्विंटल 207 200 2400 1200
नागपूर लाल क्विंटल 700 1500 2500 2250
भुसावळ लाल क्विंटल 8 1600 1600 1600
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 19 1400 2000 1700
पुणे-मोशी लोकल क्विंटल 217 500 2000 1250
कल्याण नं. १ क्विंटल 3 1400 2000 1800
सोलापूर पांढरा क्विंटल 1002 100 5000 1800
नागपूर पांढरा क्विंटल 700 1500 2500 2250
अहमदनगर उन्हाळी क्विंटल 26242 1600 2900 2300
राहूरी -वांबोरी उन्हाळी क्विंटल 4396 100 2700 1800
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 1220 625 2306 1911
श्रीरामपूर उन्हाळी क्विंटल 300 300 2431 1400
वैजापूर उन्हाळी क्विंटल 783 500 2600 1950