भाजपच्या काळात खंडकऱ्यांना जमीन मिळाली नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-   २०१४ ते २०१९ भाजप सरकारच्या काळात खंडकऱ्यांना एकही जमीन मिळाली नाही. मात्र महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर खंडकरी जमीन वाटपाचा प्रश्न निकाली काढला अाहे. उर्वरित प्रश्न एक ते दोन महिन्यात निकाली काढायचा अाहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना शिबिर लावण्याचे आदेश देण्यात आले अाहेत.

खंडकरी शेतकऱ्यांना जमीन वाटप करतांना त्यामध्ये जर चारी किंवा रस्ता असेल तर ते क्षेत्र वगळले जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूळ क्षेत्राला धक्का लागणार नाही त्यामूळे शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

येथील प्रशासकीय इमारतीत खंडकरी शेतकरी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, आमदार लहू कानडे, शेती महामंडळाच्या उपमुख्यकार्यकरी अधिकारी मंदा लड्डा,प्रांताधिकारी अनिल पवार,

शिर्डीचे प्रांताधिकारी शिंदे, तहसीलदार प्रशांत पाटील, उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर,इंद्रनाथ थोरात उपस्थित होते. मंत्री थोरात म्हणाले, सर्व खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी मिळाव्यात ही आपली अपेक्षा आहे.

मात्र उगाचच हट्ट धरू नये. या प्रश्नात आपण राजकारण करणार नाही. खंडकऱ्यांनी आपसातील वाद मिटवून घ्यावेत. जे मिळते, जे आहे ते स्वीकारावे असेही आवाहन त्यांनी केले.