Lata Mangeshkar biography in marathi : लता मंगेशकर यांचा जीवन परिचय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अत्यंत सुरेल आवाजाची देणगी लाभलेल्या, विश्वविख्यात, भारतीय चित्रपट-संगीतातील युगप्रवर्तक व सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका म्हणून त्यांचा लौकिक सर्वदूर पसरलेला अशा प्रतिभावंत गायिका लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी एका गायक (किराणा ) घराण्यात झाला. त्यांचा जन्म मध्येप्रदेशमध्ये झाला.

लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते. मराठी रंग भूमीवरील तेजस्वी गायकनट मास्टर दीनानाथ ह्यांच्या ह्या ज्येष्ठ कन्या होत.

त्यांच्या गायनाची कारकीर्द – दीनानाथांच्या गायनकलेचा वारसा त्यांना लाभला.वडिलांच्या ‘बलवंत संगीत नाटक मंडळी’ च्या रंगमंचावर बालवयात लता मंगेशकरांनी छोट्या संगीत भूमिकाही केल्या. मास्टर दीनानाथ यांच्याप्रमाणेच ‘भेंडीबाजारवाले’ खाँसाहेब अमानअली आणि देवासच्या रजबअली घराण्याचे अमानतखाँ हे लता मंगेशकर यांचे शास्त्रीय संगीतातील प्रमुख गुरू होत.

वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये (मराठी संगीत नाटक) अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली. 1942 मध्ये मंगेशकर 13 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले. 1943 मध्ये त्यांनी मुंबईतील रेडिओ स्टेशनवर काम करायला सुरुवात केली. विनायकने मंगला-गौर या मराठी चित्रपटात लता मंगेशकर यांना पहिल्यांदा समूह गायनाच्या रूपाने छोटीशी भूमिका साकारण्याची संधी दिली होती. “माता एक सपूत की दुनिया बदल दे तू” हे त्यांचे पहिले हिंदी गाणे होते.

विशेष कामगिरी- लता मंगेशकर यांनी एक हजाराहून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत. आणि छत्तीस हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषा आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत, त्यांची प्रमुख गाणी मराठी, हिंदी, बंगाली भाषेत आहेत. त्यांना भारताचा गाण कोकिळा अशी उपाधी आहे. त्या दक्षिण आशियातील विशेषत: भारतातील सर्वोत्कृष्ट आणि प्रतिष्ठित पार्श्वगायिका आहे. सर्व प्रकारच्या जागतिक विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये ’जगातील सर्वांत जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका’ म्हणून त्यांचा गौरवास्पद उल्लेख आहे. त्या ‘सुरेल चित्र’ या संस्थेच्या निर्मात्या आहेत.

त्यांना मिळालेले विशेष,प्रमुख बहुमान
फिल्मफेअर पुरस्कार (1958, 1962, 1965, 1969, 1993 आणि 1994)
राष्ट्रीय पुरस्कार (1972, 1975 आणि 1990)
महाराष्ट्र शासन पुरस्कार (1966 आणि 1967)
१९६९ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1989 मध्ये त्यांना चित्रपट जगतातील सर्वोच्च सन्मान ‘दादा साहेब फाळके पुरस्कार’ देण्यात आला.
1993 मध्ये त्यांना फिल्मफेअरचा ‘लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ देण्यात आला.
1996 मध्ये त्यांना स्क्रीनच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1997 मध्ये त्यांना ‘राजीव गांधी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
1999 मध्ये पद्मविभूषण, N.T.R. आणि झी सिनेच्या ‘लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ने सन्मानित.
2000 साली I.I.A. F. (IIFA) च्या ‘लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ने सन्मानित.
2001 मध्ये त्यांना स्टारडस्टचा ‘जीवनगौरव पुरस्कार’, नूरजहाँ पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2001 मध्ये, भारत सरकारने तुमच्या कामगिरीचा गौरव करताना तुम्हाला देशातील सर्वोच्च पुरस्कार “भारतरत्न” देऊन गौरविले.
महाराष्ट्र शासनाने त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव म्हणून त्यांच्या नावे महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दिला जातो.