बिबट्या मोकाट आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये शुकशुकाट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्याची दहशत पसरली असून, बिबट्याने शेतशिवारातील, वाड्या-वस्त्यांवर पाळीव जनावरे आणि भटक्या कुत्र्यांना लक्ष बनवून फडशै पाडण्याची जणू मोहीमच आखली आहे.

नुकतेच पारनेर तालुक्यातील शहाजापुर येथील कवड्या डोंगरावरील माऊली कृपा गोशाळेत गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने चांगलीच दहशत निर्माण केली असून त्याच्यापासून मनुष्यसह गोवंशाना धोका निर्माण झाला आहे.

श्री क्षेत्र कौडेश्वर येथील माऊली कृपा गोशाळेवर गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचावावर वाढला आहे. दर दोन दिवसांनी येथे बिबट्यांचा वावर आहे. शनिवारी सांयकाळी एक बिबट्या थेट गोशाळेच्या दारापर्यंत आल्याने जनावरांसह कर्मचारीही घाबरुन गेले.

त्याअगोदर दोन दिवसांपुर्वीही दोन बिबटे तेथे आढळले होते. गेल्या काही दिवसांपासून गोशाळा परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. माऊली कृपा गोशाळेत लहान मोठी मिळून 500 च्या आसपास गोवंश आहेत.

या गोशाळेच्या परिसारात बिबट्याचा वावर असून यामुळे मनुष्याच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. या गोशाळेत व श्री क्षेत्र कौडेश्वराला मोठ्या संख्येने भाविक येत असतात.

यामुळे भाविकातही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गोशाळेचे संचालक हभप नितीन महाराज शिंदे यांनी केली आहे.