LIC Plan : LIC ची आकर्षक योजना! महिन्याला मिळणार 16,000 रुपयांची पेन्शन, जाणून घ्या योजना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Plan : सेवानिवृत्तीनंतरचं जीवन चांगले असावं, असं प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या माध्यमांमधून बचत करत असतो. सध्या बचतीसाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत. सरकारी, सहकारी बॅंका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना आणत असतात.

सेवानिवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा आधार असतो. परंतु खासगी क्षेत्रातील नोकरदारवर्गाला पेन्शन प्लॅनमध्ये गुंतवणूक करावी लागते. खास तुमच्यासाठी एलआयसीने एक खास योजना आणली आहे. त्याअंतर्गत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 16,000 रुपये पेन्शन मिळेल.

एलआयसीची अशीच एक अप्रतिम स्कीम आहे. या योजनेचे नाव LIC जीवन अक्षय पॉलिसी असे आहे. समजा तुम्ही तुमच्या निवृत्तीचे नियोजन करत असल्यास तर या परिस्थितीत तुम्ही एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये पैशांची गुंतवणूक करू शकता. या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला चांगला फायदा मिळत आहे. जाणून घेऊयात त्याबद्दल सविस्तर माहिती.

हे लक्षात घ्या LIC ची जीवन अक्षय योजना एक विशेष प्रकारची सिंगल प्रीमियम पॉलिसी सेट करते ज्यात तुम्हाला तुमचे पैसे केवळ एकदाच गुंतवावे लागणार आहेत. या योजनेअंतर्गत, तुम्हाला पैसे मिळू शकतात.

एलआयसीच्या या खास तुम्ही जितके पैसे गुंतवलेत तितकी पेन्शन तुम्हाला मिळेल. या योजनेत तुम्हाला कमीत कमी 1 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी तुमचे कमीत कमी वय 30 वर्षे इतके असावे.

समजा तुम्ही या योजनेत 35 लाख रुपये गुंतवल्यास तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 16,479 रुपयांची पेन्शन मिळेल. यात, तिमाही आधारावर पेन्शनची रक्कम 49,744 रुपये असून अर्धवार्षिक आधारावर पेन्शनची रक्कम 1,00,275 रुपये इतकी आहे.

तसेच तुम्हाला वार्षिक आधारावर 2 लाख 3 हजार 700 रुपये मिळतात. हे लक्षात घ्या गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून ही योजना सर्वात सुरक्षित मानली जाते. या कारणास्तव अनेक लोक एलआयसीच्या या खास योजनेत गुंतवणूक करत आहेत.