अहमदनगर मध्ये महाविकास आघाडीत बिघाडी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी महापालिकेत या आघाडीतील घटक पक्षांचे सूत जुळले नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले. राष्ट्रवादीने सभापतिपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेनेही रिंगणात उडी घेतली आहे.

सभापतिपदासाठी गुरूवारी निवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांनी अर्ज दाखल केला, त्यावेळी महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी हजेरी लावली. सूचक व अनुमोदकांची नावे पाहता घुलेंना काँग्रेस व बसपाचाही पाठिंबा असल्याचे दिसले. अर्ज दाखल करताना शिवसेनेला दूर ठेवण्याची खेळी पुन्हा एकदा राष्ट्रवादीने केली.

पक्षीय बलाबल काहीही असले, तरी राष्ट्रवादी भाजपची मदत घेऊन स्थायी समिती ताब्यात घेणार असे चित्र आहे. राष्ट्रवादीचे संपत बारस्कर यांनी ‘’शी बोलताना स्पष्ट केले की, आमची महाविकास आघाडीच आहे. स्थायीमधील शिवसेनेच्या सदस्यांना आम्ही अर्ज दाखल करण्याबाबत कळवले होते.

अर्ज भरताना भाजपची उपस्थिती केवळ घुलेंशी असलेल्या मैत्रीपोटी असे सांगितले होते. राष्ट्रवादीने भाजपला हाताशी धरत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे संजय शेंडगे यांनी सभापती निवडीत शिवसेना अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले होते. बुधवारी शिवेसनेकडून विजय पठारे यांनी दोन अर्ज दाखल केले.

एकासाठी रिता भाकरे सूचक असून परसराम गायकवाड अनुमोदक आहेत. दुसऱ्या अर्जासाठी भाकरे सूचक व अनुमोदक सचिन शिंदे आहेत. अर्जांच्या छाननीनंतर मतदान घेतले जाईल. वरिष्ठांच्या आदेशानुसार शिवसेना पुढील दिशा ठरवेल. दरम्यान, घुले शिवसेनेच्या अर्जावर आक्षेप घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समजली.

  • किंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर