Mansoon Update: कसा असेल यंदाचा पावसाळा? भारतीय शेती आणि मान्सून आहेत एकमेकांसाठी पूरक; वाचा याविषयी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Krushi new :- भारत कृषीप्रधान देश आहे कारण की आपल्या देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती क्षेत्रावर (Agriculture Sector) अवलंबून आहे.

देशाची अर्थव्यवस्था (Indian Economy) कृषी क्षेत्रावर आधारित असल्याने जीडीपीमध्ये (GDP) कृषीचा मोठा सिंहाचा वाटा आहे. भारतातील ग्रामीण भाग (Rural India) हा पूर्ण शेती क्षेत्रावर अवलंबून आहे त्यामुळे ग्रामीण क्षेत्राचा विशेषता कृषी क्षेत्राचा आपल्या देशाच्या जीडीपीमध्ये मोठा वाटा आहे.

कदाचित महात्मा गांधी यांना देखील कृषी क्षेत्राचे व ग्रामीण भागाचे महत्त्व ज्ञात होते म्हणून त्यांनी खरा भारत हा गावातच वसतो असे वारंवार प्रतिपादन केले. भारताची शेती ही पावसाळ्याच्या पाण्यावर अवलंबून आहे.

यामुळे भारतीय शेती आणि मान्सून (Mansoon) हे परस्परपूरक आहेत. पाण्याविना शेती करणे निव्वळ अशक्य आहे, यामुळे भारतीय शेतीचा संपूर्ण डोलारा हा मान्सूनवर अवलंबून असतो.

मान्सूनच्या आगमनावर कृषी क्षेत्राचे उत्पादन व शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmers Income) अवलंबून असते. शेतकरी राजा (Farmer) तरणार का मरणार हे सर्वस्वी मान्सूनच्या हातातच असते.

एकंदरीत शेती क्षेत्राचे सर्व भवितव्य केवळ आणि केवळ मान्सूनच्या हातातच असते. शेतीतील सर्व कामे ही मान्सूनच्या वेळापत्रकाप्रमाणे केली जातात.

चला तर मग मित्रांनो आज आपण यंदा देशातील मान्सून कसा असेल याविषयी जाणून घेऊ. 2022 चा मान्सून असेल तरी कसा? शेतकरी बांधवांना मान्सून विषयी जाणून घेण्याची कायमच जिज्ञासा राहिली आहे.

याचे प्रमुख कारण म्हणजे भारतीय शेती ही पूर्णतः मान्सूनवर अवलंबून असून मान्सूनच्या हालचाली वरच शेतीची कार्य अवलंबून असतात.

मान्सून चांगला झाला तर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते आणि याचा परिणाम सरळ अर्थव्यवस्थेवर होतो त्यामुळे सर्वांचे लक्ष हवामान विभागाच्या अंदाजाकडे लागलेले असते.

यंदाच्या पावसाळ्याविषयी अद्याप पर्यंत भारतीय हवामान खात्याने कुठलाच अंदाज जाहीर केलेला नाही. मात्र, ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने तसेच स्कायमेट या हवामान अंदाज व्यक्त करणाऱ्या संघटनेने मान्सून कसा राहील याविषयी माहिती दिली आहे.

ऑस्ट्रेलियन हवामान खात्यानुसार, यावर्षी चारही महिने धोधो पाऊस बरसणार आहे राज्यात यंदाचा मान्सून असमाधानकारक असल्याचे ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने वर्तवले आहे.

यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवीत झाल्या असून त्यांना खरीप हंगामात चांगल्या उत्पन्नाची आशा आहे. ऑस्ट्रेलियन हवामान खाते व्यतिरिक्त स्कायमेटने देखील यंदाच्या पावसाळ्याचा अंदाज वर्तवला आहे.

स्कायमेट अनुसार, या वर्षी मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा मान्सून मध्ये सरासरीच्या 96 ते 104 टक्के पावसाची नोंद होऊ शकते.

स्कायमेटने सांगितले की, मान्सूनचा प्रभावी अंदाज वर्तवण्यासाठी डेटा गोळा करण्याचे कार्य सुरू आहे आणि एप्रिल मध्ये अजून सुधारित अंदाज स्कायमेट वर्तवणार आहे.

स्कायमेटने आत्ता वर्तवलेला अंदाज हा प्राथमिक स्वरूपाचा असून हा अंदाज खरा ठरला तर निश्चितच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते.