अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-गेल्या कित्येक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेला कौठा-म. ल. हिवरा रस्ता अखेर जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नामुळे हा प्रश्न सुटला.
आता या रस्त्याचे डांबरीकरण निम्यापर्यत झाले असल्याने गावकऱ्यांची अनेक वर्षांपासून होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे.
कौठा-म. ल. हिवरा हा गावापासून ते गुप्त पुलापर्यंत रस्ता खराब झाला होता. पावसाळ्यात कोणतेही वाहन जात येत नसल्याने रुग्णांना बैलगाडी किंवा ट्रॅक्टरचा वापर करावा लागत होता.
मंत्री शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नामुळे हा रस्ता दुरुस्त होत आहे. तर काही ठिकाणी डांबरीकरण सुरू आहे.
रस्त्यामुळे विद्यार्थी, दूध उत्पादक शेतकरी, वाहन चालक याना मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या रस्त्यावर खड्डे झाल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या होत्या. मुळा, ज्ञानेश्वर कारखान्याला या रस्त्याने हजारो टन उसाची वाहतूक होत होती.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|