सर्वांची बोलती बंद करायला मारुती आणत आहे आपली इलेक्ट्रिक SUV; सिंगल चार्जमध्ये मिळेल 550km रेंज!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Suzuki Brezza EV : ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी पाहता, रोज नव-नवीन वाहने मार्केटमध्ये येत आहेत. यामुळे मार्केटमध्ये स्पर्धा देखील खूप वाढली आहे. अशातच अशा काही कंपन्या आहेत, ज्या उत्तम फीचर्ससह कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करत आहेत, जेणेकरून सामान्य ग्राहक देखील इलेक्ट्रिक वाहन खरेदी करू शकेल.

अशातच मारुती गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत लोकांसाठी आपली चांगल्या मोटारगाड्या बनवत आहे. या कंपनीवर लोकांचा विश्वास देखील खूप आहे. आपल्या ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी कंपनीने आपल्या ग्राहकांच्या प्रत्येक लहान-मोठ्या गरजा लक्षात घेतल्या आहेत.

दरम्यान, आता बाजाराच्या मागणीनुसार कंपनी आपली नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. चला तर मग जाणून घेऊया मारुतीच्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये काय खास पाहायला मिळणार आहे?

तुम्हाला माहीतच असेल, मारुतीने काही वर्षांपूर्वी सीएनजी आवृत्तीमध्ये मारुती सुझुकी ब्रेझा बाजारात लॉन्च केली होती. आता कंपनी त्याचे इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये रूपांतर करून बाजारात आणणार आहे. ज्याचे नाव Maruti Suzuki Brezza EV असणार आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासोबतच सांगण्यात येत आहे, या इलेक्ट्रिक कारमध्ये तुम्हाला संपूर्ण 550 किमीची धनसू रेंज पाहायला मिळेल.

या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये एवढी लांब रेंज मिळण्यामागील कारण म्हणजे यामध्ये दिलेला सर्वात मजबूत बॅटरी पॅक आहे, जो 60kwh क्षमतेच्या लिथियम आयनच्या बॅटरी पॅकमध्ये जोडला गेला आहे. यासोबतच या इलेक्ट्रिक कारमध्ये तुम्हाला 320 लीटरची मोठी बूट स्पेस पाहायला मिळते. या SUV च्या माध्यमातून तुम्ही खडकाळ रस्त्यावरही आरामदायी प्रवासाचा आनंद घेऊ शकता. कारण यामध्ये तुम्हाला आतापर्यंतची सर्वोत्तम सस्पेन्स प्रणाली दिली जात आहे.

ही इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत कधी लॉन्च याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. तरीदेखील पण एका रिपोर्टनुसार, पुढच्या वर्षी ते बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास त्याची सुरुवातीची किंमत सुमारे 15 लाख एक्स-शोरूम किंमत असू शकते.