अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदे | अधीक्षक अभियंता धुमाळ यांची आमदार पाचपुते यांनी कुकडीचे आवर्तन कशा पद्धतीने चालू ठेवता येईल याविषयी चर्चा केली. धरणातच पाणी साठा कमी असल्यामुळे सध्या कुकडीत ५०० क्युसेक्सने एवढ्या कमी दाबाने विसर्ग चालू आहे.

ते पाणी सूचनेप्रमाणे विसापुर धरणामध्ये वळवण्यात आले आहे. धरणक्षेत्रात २८ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा असल्यामुळे लाभक्षेत्रातील सर्व आवर्तन पूर्ण होऊ शकत नाही.

पाऊस लांबणीवर पडल्यास हे चालू पाणी विसापूर मध्येच चालू ठेवण्याबाबत सूचना केल्याचे पाचपुते म्हणाले. तसेच धरणक्षेत्रात पाण्याची आवक होताच पाणी श्रीगोंद्यातील सर्व वितरीकांना पूर्ण दाबाने सोडण्यात यावे,

असे पाचपुते यांनी सांगितले. यास धुमाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाण्याची आवक वाढताच सर्व वितरिकांना पुर्ण दाबाने पाणी सोडण्यात येईल, असे सांगितले.