आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले एक महीन्याचे वेतन, म्हणाले कोकणवासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे ….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- कोकण मधील आपतीग्रस्त नागरीकांच्या मदतीकरीता राज्यसरकारचा हात आखडताच आहे. कोकणावर आलेलं संकट हे आपल्‍याच कुटूंबावर आलेल आहे. नुसता शाब्दीक दिलासा देवून काही होणार नाही.

कोकणवासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची वेळ असून, शिर्डी मतदार संघातून कार्यकर्त्‍यांनी गावपातळीवर मदतीसाठी पुढाकार घ्‍यावा असे आवाहन करतानाच, त्यांच्या मदतीकरीता एक महीन्याचे वेतन देण्‍याचा निर्णय आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केला.

यासंदर्भात बोलताना आ.विखे पाटील म्हणाले की, कोकण मध्ये आलेले नैसर्गिक संकट खूप भीषण असून राज्य सरकारने तात्काळ मदत जाहीर करणे अपेक्षित होते, पण तसे होताना दिसत नाही.

कोकणातील नागरीकांच्या मदतीसाठी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून मदत पाठविण्याचे नियोजन गावपातळीवर करण्याच्या सूचना आ.विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. ही एकत्रित मदत कोकणात संकटग्रस्‍त कुटुंबियांपर्यंत पोहचविण्‍यात येईल.

माणूसकीचा धर्म म्‍हणून मतदार संघातील सर्व कार्यकर्त्‍यांनी आपल्‍या गावातून शक्‍य ती मदत गोळा करुन, कोकणातील आपत्‍तीग्रस्‍तांना पाठविण्‍यासाठी पुढाकार घेण्‍याचे आवाहनही आ.विखे पाटील यांनी कार्यकर्त्‍यांना केले आहे.

या मदतीची सुरूवात त्यांनी स्वतःपासून केली असून, आपले एक महीन्याचे वेतन देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. यापूर्वी राज्यात अनेक नैसर्गिक संकट आली. पण राज्य सरकारची कोणतीच मदत आपतीग्रस्त किंवा शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही.

पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना कोणताच लाभ झालेला नसून, पिक विमा कंपन्‍यांकडून शेतक-यांची फसवणूक झाली असल्‍याकडे लक्ष वेधून नैसर्गिक आपत्‍तीत सरकारने नागरीकांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याची गरज त्‍यांनी व्‍यक्‍त केली.