आमदार राजळे म्हणाल्या राजकीय अनुभव नसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करणे हास्यास्पद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- पाथर्डी तालुक्यातील नेतृत्व स्वतःच्या कर्तृत्वाने केंद्रीय मंत्री पदापर्यंत पोहोचले. (बबनराव ढाकणे) त्यांच्याबद्दल आम्हाला आजही मोठा आदर व अभिमान आहे. मात्र, ज्यांना अजून सामाजिक, राजकीय कामाचा, निवडणुकीचा अनुभव नाही, अशा व्यक्तींनी पत्रकार परिषद घेऊन (ऋषिकेश ढाकणे) आमच्यावर टीका करणे हास्यास्पद आहे.

विरोधकावर काय बोलावे, आम्ही काही बोललो कि ते घरात बसून पत्रकार परिषद घेत व्यर्थ टीका करतात, अशा शब्दात आमदार मोनिका राजळे यांनी राजकीय टीकाकारांना उत्तर देत कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी सतर्क केलेे आहे. तालुक्यातील खेर्डे, सांगवी, पागोरी पिंपळगाव, वसूजळगाव व सुसरे येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन प्रसंगी आमदार राजळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, पंचायत समिती सभापती सुनीता दौंड, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर, सुनील ओव्हळ, सुभाष केकाण, सोमनाथ खेडकर, खेर्डेच्या सरपंच आशाताई सांगळे, सांगावीच्या सरपंच सुर्वणा एकशिंगे, पागोरी पिंपळगावच्या सरपंच छाया दराडे, भगवान साठे, सचिन वायकर, गंगाधर सुपेकर आदी उपस्थित होते.

आमदार राजळे म्हणाल्या, मताचे आकडे पाहून गावांचा विकास केला नाही. ज्या गावात अथवा ठिकाणी गरज आहे अशा ठिकाणी निधी दिला. अकोले सारख्या गावांमध्ये १५ साखळी बंधारे देऊन गाव व परिसराचे नंदनवन केले. मागील सरकारने मंजूर केलेले काम आघाडी सरकारने बंद केले. दोन वर्षे होत आले तरी पालकमंत्र्यांनी अजून शासकीय कमिट्या सुद्धा केलेल्या नाहीत.

पाऊस लांबल्याने शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी पालकमंत्र्यांना भेटून करणार आहे. सध्याचे तीन पक्षाचे सरकार भाजप आमदार असलेल्या मतदारसंघात विकास कामांना निधी देत नाही. गेल्या दीड वर्षात निधी मिळाला नाही. भूमिपूजन होत असलेली कामे मागील सरकारच्या काळात मंजूर झालेली आहेत.