Mansoon 2022: आज केरळमध्ये मान्सूनचे होणार जोरदार आगमन; भारतीय हवामान विभागाचा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mansoon 2022 : देशातील शेतकरी बांधव (Farmers) तसेच सामान्य जनता मान्सूनची (Mansoon 2022) मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे.

पूर्व मशागतीसाठी (Pre Cultivation) लगबग करत असलेला बळीराजा आणि उकाड्यापासून हैराण झालेली जनता मान्सूनच्या प्रवासावर मोठे बारीक लक्ष धरून आहेत. आता भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) सांगितल्याप्रमाणे, दरवर्षीच्या तुलनेने या वर्षी मान्सूनचा प्रवास हा चांगला सुयोग्य असून भारतात मान्सून आता मोठ्या थाटात दाखल झाला आहे.

हवामान विभागानुसार, मध्यंतरी आलेल्या असनी चक्रीवादळामुळे मान्सून साठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे मान्सून (Mansoon Arrive In Keral) वेळेआधीच यंदा भारतात दाखल होणार असल्याचे वर्तवले गेले आहे.

भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या ताजा अंदाजानुसार आज मान्सून केरळमध्ये धडकणार आहे. कालपर्यंत मान्सून हा श्रीलंकेत होता मात्र, श्रीलंकेत मान्सून साठी पोषक वातावरण तयार झाल्याने मान्सूनची गती आता वाढली आहे.

यामुळे आज मान्सून केरळमध्ये येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे मान्सूनच पदार्पण केरळमध्ये होताच याचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी बघायला मिळणार असून विदर्भात पूर्व मान्सून पावसाची हजेरी राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

केरळ मध्ये मान्सून आज पोहचल्यास जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होणार आहे. मित्रांना आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, मान्सून महाराष्ट्रात सर्वप्रथम तळकोकण गाठत असतो अन त्यानंतर मान्सूनचा हा महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी दाखल होत असतो.

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाच्या सऱ्या बघायला मिळत आहेत. आज राजधानी मुंबईत सकाळी सकाळी मान्सूनपूर्व पाऊस झाला. कोल्हापूरमध्ये देखील सकाळी पाऊसाचे आगमन झाले.

हवामान विभागाच्या मध्ये मान्सूनचा सद्यस्थितीत सुरू असलेला प्रवास असाच कायम राहिला तर पुढील आठवड्यात मान्सून हा तळकोकण गाठेल आणि त्यानंतर राजधानी मुंबई मान्सूनचा प्रवेश होईल. एकीकडे आता मान्सूनच्या प्रवासाला गती आली आहे तर दुसरीकडे मान्सूनपूर्व पावसाच्या सऱ्या देखील बघायला मिळत आहेत.

पुढील चार दिवस मुंबई, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट जारी केला गेला आहे. निश्चितच मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी तसेच उकाड्याने हैराण झालेल्या सामान्य जनतेस हवामान विभागाच्या या अद्ययावत अंदाजामुळे दिलासा मिळाला आहे.