Monsoon Update: पंजाबरावांचा आजचा मान्सून अंदाज..! आज ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस, पंजाबरावं काय म्हणाले वाचा

Monsoon Update: राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मोसमी पावसाने (Rain) सपाटा लावला आहे. राज्यात रोजचं पावसाची (Monsoon)  हजेरी बघायला मिळत आहे. राजधानी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे जलमय परिस्थिती निर्माण झाली असून मुंबई तुंबली (Monsoon News) आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून विदर्भातील अमरावती मध्ये देखील पूरसदृश्य परिस्थिती बघायला मिळत आहे. मात्र असे असले तरी राज्यातील अजूनही काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या काळजाची धडधड देखील वाढली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तर पावसाअभावी काही ठिकाणी दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावले आहे. शिवाय ज्या ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस कोसळत आहे त्या ठिकाणी देखील पिकांची नासाडी होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

एकंदरीत, पावसाअभावी तसेच जास्त पावसामुळे राज्यातील शेतकरी बांधव संकटात सापडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दरम्यान, आपल्या हवामान अंदाजासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या पंजाब रावांच्या नवीन मान्सून अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) समोर आला आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा पंजाब रावांच्या मान्सून अंदाजावर (Panjab Dakh Weather Report) मोठा गाढा विश्वास आहे.

शेतकऱ्यांच्या मते, पंजाबरावांचा (Panjabrao Dakh) मान्सून अंदाज त्यांच्यासाठी खूपच फायद्याचा ठरत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव पंजाब रावांच्या मान्सून अंदाजाकडे (Panjabrao Dakh News) मोठे बारीक लक्ष ठेवून असतात. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया पंजाबरावांचा मान्सून अंदाज.

पंजाबराव यांच्या मते, आज राज्यात सर्वत्र मुसळधार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. आज पासून नऊ तारखेपर्यंत राज्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. पंजाबराव यांनी शेतकरी बांधवांना 11 आणि 12 जुलै दरम्यान शेतीची कामे पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे कारण की या कालावधीत राज्यात पाऊस उघडीप देणार आहे.

तसेच 13 तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार असून 13 जुलै ते 17 जुलै दरम्यान राज्यात मुसळधार ते अती मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे. शिवाय या कालावधीत राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस कोसळणार आहे.

यामुळे पंजाबराव यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील यावेळी दिला आहे. तसेच 13 जुलै 17 जुलै या दरम्यान सर्वाधिक पाऊस पूर्व विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांत बघायला मिळणार आहे.

यामुळे या विभागातील नागरिकांनी या कालावधीत सतर्क राहण्याचा इशारा पंजाबराव पंजाबरावं यांनी दिला आहे. शिवाय शेतकरी बांधवांनी या कालावधीत आपल्या पिकांची तसेच पशुधनाची काळजी घेण्याचे देखील आव्हान या वेळी पंजाबराव यांनी केले आहे.