खासदार राऊत म्हणाले…परिवहनमंत्र्यांना वरच्या सरकारचं लव्ह लेटर आलं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचा मागे ईडीच्या कारवायांचे सत्र सुरूच आहे. नुकतेच परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

ईडीने येत्या मंगळवारी म्हणजेच 31 ऑगस्टला परब यांना ईडीच्या कार्यलयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. आपल्या नोटीस आज संध्याकाळी मिळाली आहे.

नोटीस नेमकी कशासाठी हे वकील तज्ञ समिती समवेत चर्चा करून उत्तर देईल असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं. ईडीने नोटीस बजावल्यानंतर अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. दरम्यान याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना अटक झाली. त्या जिल्ह्याचे अनिल परब हे पालकमंत्री आहेत. जनआशीर्वाद यात्रा संपली आणि ताबडतोब या पालकमंत्र्यांना वरच्या सरकारचं लव्ह लेटर आलं. ईडीचं. येऊ द्या. कायदेशीर लढाई आहे. आम्ही काय कुणाला धमक्या देणार नाही.

आम्ही नॉर्मल माणसं आहोत. नॉर्मल माणसं कायदेशीर लढाया लढतात आणि जे असत्य आहे, जे बनावट आहे त्याचा पर्दाफाश करतात. आमच्या लढाईला नैतिकतेचं बळ आहे. आम्ही बनावट नाही. तुम्ही हे सर्व आमच्यावर लादत आहात,” असं रोखठोक भाष्य राऊत यांनी केलंय.

शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता ईडीने परिवहनमंत्री अनिल परब यांना नोटीस जारी केली आहे. दरम्यान यापूर्वी एकनाथ खडसे यांना देखील ईडीने चौकशीसाठी बोलवले होते. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.