अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-  डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे आंदोलन कर्ते कामगार यांची डॉ. तनपुरे कारखान्याचे सत्ताधारी खा.डॉ.सुजय विखे हे आज रविवारी सकाळी भेट घेऊन कामगारांच्या मागण्या मार्गी लावणार आहेत.त्यांनतर राहुरी येथील शेतकरी मेळाव्यास डॉ.तनपुरे कारखान्याबाबत ते योग्य ती घोषणा करतील.

याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे., काल कामगार आयुक्त शेख यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन कारखाना व्यवस्थापन संचालक मंडळास कामगारांच्या मागण्या बाबत योग्य तो निर्णय घेण्यास सूचना करतो असे कामगारांशी बोलताना सांगितले. डॉ. तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर थकीत २५ कोटी ३६ लाख रुपयांची देणी मिळवण्यासाठी उपोषण सुरू केले आहे.

उपोषणाच्या सहाव्या दिवसापर्यंत कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे व संचालक यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण कामगारांच्या मागण्याबाबत सकारात्मक विचार करून आर्थिक निधी उपलब्ध झाल्या नंतर कामगारांची काही प्रमाणात देणी देण्यात येतील असे सांगितले परंतु उपोषणकर्त्यांनी लेखी आश्वासन मागितल्याने कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळ उपोषणकर्त्यांशी चर्चा निष्फळ ठरली शुक्रवारी रात्री श्रीरामपुरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी भेट घेऊन कामगारांच्या मागण्या बाबत योग्य तो विचार करण्यास सांगू असे आश्वासन दिले होते.द

रम्यान शनिवारी सकाळी आरपीआयाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या सुचनेवरून तालुकाध्यक्ष विलास साळवे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन दिनांक २९ ऑगस्ट पर्यंत कामगारांबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास सोमवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी आरपीयच्या वतीने नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा साळवे यांनी दिला. याच दरम्यान भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे उपोषणस्थळी येऊन कामगारांच्या उपोषणास माझा पाठिंबा आहे.

तनपुरे कारखान्याचे सर्वेसर्वा खा.सुजय विखे रविवारी सकाळी ९ वाजता उपोषणस्थळी येऊन कामगारांच्या मागण्या बाबत योग्य विचार करणार आहे.कामगारांनी संयम बाळगावा विखे योग्य तो निर्णय उद्या सकाळी जाहीर करतील असे भनगडे यांनी सांगितले. उपोषणस्थळी कामगार आयुक्त शेख यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून उपोषण सोडण्यास सूचना केल्या. चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी तर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते जालिंदर घिगे तालुकाध्यक्ष अनिल जाधव, शहराध्यक्ष पिंटू साळवे,

निलेश जगधने, भाऊसाहेब पवार तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे,जिल्हा उपाध्यक्ष भागवत मुंगसे,सुधीर झांबरे, सुनील शेलार, बाबासाहेब मुसमाडे, रोहित खंडागळे, राहुल चोथे, अवि पेरणे, सुभाष चोथे,संतोष येवले, बाळासाहेब शिंदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे आदींनी उपोषणकर्त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. खा. विखे यांनी राहुरी येथील पांडुरंग लॉन्स येथे आज रविवार २९ ऑगस्ट रोजी शेतकरी मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यातून करखान्याच्या परिस्थिती बाबत शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.

त्यापूर्वी सकाळी ९ वाजता उपोषणस्थळी खा.डॉ.सुजय विखे उपोषणकर्त्यांची भेट घेऊन कामगारांच्या मागण्या बाबत योग्य तो निर्णय जाहीर करणार आहे. त्यानंतर राहुरी येथील मेळाव्यात डॉ.तनपुरे कारखान्याची सद्यस्थिती कामगारांचे भवितव्य कारखान्याच्या भवितव्याच्या संदर्भात शेतकरी मेळाव्यात खा. विखे काय बोलणार याकडे राहुरी तालुक्याचे लक्ष लागले आहे.