Mula dam ahmednagar : जाणून घ्या मुळाधरणाचा पाणीसाठा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- मुळा धरणाच्या उजवा व डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात पुर्वा नक्षञातील पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता तालुक्यातील बहुतांशी भागात दमदार पावसाला सुरुवात झाली.

मंगळवारी सकाळपर्यंत पाऊस सुरू होता. मंगळवारी राहुरी ५५ मिलीमीटर, मुळानगर ४६ मिलीमीटर, वांबोरी ७७ मिलीमीटर, कोतुळ ७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १ जुन ते ३१ ऑगस्टपर्यंत तालुक्यात पाऊस कमी झाला आहे.

पुनर्वसु व पुष्य नक्षञातील ठराविक दिवसाचा अपवाद वगळता सर्वच नक्षञ कोरडे गेले. पुर्वा नक्षञात तालुक्यात दमदार पावसाचे झालेले आगमन राहुरी तालुक्यातील रब्बी तसेच इतर पिकांना लाभदायक ठरणार आहे. सोमवारी तालुक्यात दमदार पावसाचे आगमन झाले.

परंतु, घाटमाथ्यावर पावसाची अवकृपा कायम आहे. ३१ ऑगस्टला कोतुळकडुन मुळा धरणात ५९७ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. तर सायंकाळी ६ वाजता मुळाधरणाचा पाणीसाठा १९ हजार १७३ दशलक्ष घनफूट झाल्याने धरण ७३.७४ टक्के भरले आहे.