राष्ट्रवादीचे ‘हे’आमदार बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी आग्रही..!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :-बैलगाडा शर्यतीसंदर्भात राज्य शासनाने केलेल्या कायद्याविरोधातील सर्वोच्च न्यायालयातील याचिकेची सुनावणी तात्काळ घेण्यात येऊन या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी आग्रही भुमिका घेण्याची मागणी आमदार नीलेश लंके यांनी पशुसंंवर्धन, दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आ. लंके यांनी मंंत्री केदार यांची भेट घेऊन शेतकरी वर्गाच्या जिव्हाळयाच्या प्रश्नावर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली.  बैलगाडा शर्यतीची महाराष्ट्राला सुमारे चारशे वर्षांपूर्वीची परंपरा आहे. पारंपारीक वारसा व शेतकरी वर्गाचा आवडता छंद म्हणून या शर्यतीकडेे पाहिले जाते.

बैलांचे संगोपन शेतकरी स्वयंप्रेरणेने व स्वखर्चाने करतात. बैलांचे प्रदर्शन व शर्यतीवरील बंदीमुळे बैलांच्या जाती नामशेष होण्याची भिती आहे. शर्यत बंदीमुळे शेतकरी वर्गाची गाय, बैल जोपासण्याची प्रेरणाच नष्ट होत आहे. ग्रामिण भागात देवदेवतांच्या यात्रेमध्ये बैलांचे प्रदर्शन व शर्यती आयोजित करण्याची मोठी परंपरा आहे.

त्यामुळे ग्रामिण भागात मोठी आर्थिक उलाढाल होते.तामीळनाडू व कर्नाटक राज्यामध्ये बैलगाडा शर्यतीबाबत कायदा केलेला आहे. याच कायद्याच्या धर्तीवर बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सन २०१७ मध्ये कायदा केलेला आहे. परंतू सदर कायद्याविरोधात मुंबईतील अजय मराठे  यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

न्यायालयाने या सुनावणी दरम्यान स्पष्ट केले आहेे की यापूर्वी सन २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातलेली आहे.

तामीळनाडू राज्यात याच धर्तीवर कायदा करण्यात आलेला असून तेथील शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने अद्याप बंदी घातलेली नाही. त्यामुळे बैलगाडा शर्यतींच्या याचिकेसंदर्भातील  सुनावणी तात्काळ घेण्यात यावी. यासाठी राज्य शासनाच्या वतीने पुढाकार घेण्याची विनंती आ. लंके यांनी केली आहे.