नीरज चोप्रा म्हणाला ज्या दिवसांपासून पदक माझ्या खिशात आलं आहे. त्या दिवसापासून …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :-ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरच त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर ऑलिम्पिक विजेते थेट दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये पोहोचले.

तिथे त्यांचा क्रीडामंत्री अनुराग ठाकुर, क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक आणि कायदेमंत्री आणि माजी क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारताने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण ७ पदक पटकावली आहे. त्यात एक सुवर्ण पदकाचा समावेश आहे.

सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राने यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. गोल्डन बॉय नीरज चोप्राने मंचावर आल्यानंतर सर्वांना सुवर्ण पदक दाखवलं. “ज्या दिवसांपासून पदक माझ्या खिशात आलं आहे. त्या दिवसापासून मी काही खाऊ शकलो नाही की, झोपू शकलो नाही.

तुम्ही दिलेल्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद”, असं नीरज चोप्रा याने सांगितलं. दरम्यान टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुवर्णपदक पटकावणारा भालाफेकपटू नीरज चोप्राला आतापर्यंत जवळपास ११ कोटींचे बक्षीस जाहिर झाले आहे.

भारतासाठी अॅथलेटीक्समधील पहिले पदक तेही सुवर्ण जिंकून देणाऱ्या नीरजवर बक्षीसांचा वर्षाव झाला नसला तर नवलच. म हिंद्रा आणि महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक्सयूव्ही ७०० ही गाडी भेट देणार असल्याची घोषणा केली आहे. या सर्व बक्षीसांच्या पलीकडे नीरजला एक खास भेट मिळण्याची शक्यता आहे.

ऑलिम्पिकमध्ये भारत गेल्या १३ वर्षापासून सुवर्णपदकाची वाट पाहत होता. इतक नव्हे तर अॅथलेटिक्समध्ये देशाला १२१ वर्षात एकही पदक मिळाले नव्हते.

पदकाचा हा दुष्काळ नीरजने सुवर्ण पटकावून भरून काढला. नीरज भारतीय लष्करात सुभेदार म्हणून कार्यरत आहे. तो राजपूताना रायफल्सच्या तुकडीत आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण मिळवण्याआधी नीरजला लष्कराकडून विशेष सेवा पदक देऊन सन्मानित केले गेले होते.