New Rules : कामाची बातमी! आधार, पासपोर्ट पासून DL पर्यंत हेच कागदपत्र पडणार उपयोगी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Rules : प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला कोणते ना कोणते बदल केले जातात. ज्याचा ग्राहकांच्या बजेटवर मोठा परिणाम होत असतो. आजपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी काही नियम बदलले आहे. आजपासून जन्म प्रमाणपत्र देशभरात एकच कागदपत्र बनले आहे.

आधार कार्डचा केला जात होता वापर

वास्तविक आत्तापर्यंत आधार कार्ड हा असा कागदपत्र मानला जात होता, अशी माहिती आहे. परंतु आता ‘जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा 2023’ ला राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता जन्म प्रमाणपत्र हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज बनलेला आहे. म्हणजेच आता याचा असा अर्थ की आधार कार्डसह अनेक कागदपत्रे याद्वारेच तयार केली जाणार आहेत.

जन्म प्रमाणपत्र म्हणजे?

खरंतर जन्म प्रमाणपत्र हे एक असे दस्तऐवज आहे ज्यात मुलीची किंवा मुलाची जन्मतारीख, जन्म ठिकाण, त्याचे लिंग आणि त्याच्या पालकांच्या नावांसह इतर महत्त्वाचे तपशील देखील नोंदवण्यात येतात. तसेच जन्म प्रमाणपत्राद्वारे मुलाची ओळख निश्चित करण्यात येते आणि त्याच्या पालकांची माहिती देखील त्यात असते. अशातच आता आधार कार्ड असूनही जन्म प्रमाणपत्र आवश्यक असेल, हे लक्षात ठेवा.

किती दिवसात तयार होतो जन्म दाखला?

मुलाच्या जन्मानंतर 21 दिवसांच्या आत पालकांना जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे गरजेचे आहे. समजा जर एखाद्या पालकाने 21 दिवसांच्या आत नोंदणी केली नाही तर त्यांना 30 दिवसांच्या आत जन्म नोंदणी करता येईल, अशी कायद्याच्या कलम 13 मध्ये तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी केवळ 2 रुपये विलंब शुल्क असणार आहे.

कोणती कागदपत्रे तयार केली जातात?

आता तुम्हाला जन्म प्रमाणपत्रावरून पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, आधार, रेशन कार्ड, लोकसंख्या रजिस्टरआणि ड्रायव्हिंग लायसन्स तयार करता येईल. याचा उपयोग तुम्हाला विवाह प्रमाणपत्र, मालमत्ता नोंदणी, कोणत्याही शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश आणि भविष्यात सरकारने तयार केलेल्या डेटाबेसमध्ये करता येऊ शकतो, हे लक्षात ठेवा.