रात्रीची संचारबंदी लागू नाही…. राज्य सरकारने घेतला निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- निर्बंध किं वा रात्रीची संचारबंदी लागू करावी, अशी सूचना केंद्र सरकारने केली असली तरी राज्याने आणखी प्रतीक्षा करण्याचे संकेत दिले आहेत.

तात्काळ नव्याने निर्बंध, रात्रीची संचारबंदी लागू न करण्याचे सूतोवाच राज्य सरकारने केले आहे. राज्यात सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या पूर्वार्धात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. तसेच पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राबवलेल्या सार्वत्रिक लसीकरण मोहिमेच्या धर्तीवर राज्यात आपापल्या भागांत लसीकरण मोहीम राबवण्याची सूचना ठाकरे यांनी केली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोनाविषयक परिस्थितीवर चर्चा झाली. जगात सी. १.२. हा करोनाचा नवा विषाणू पसरत असल्याने त्याबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

उत्तर प्रदेशात प्लेगसदृश एका नवीन रोगाची साथ पसरली असून नागपूर परिसरात काही रुग्ण आढळल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.

करोनाची तिसरी लाट येणार असल्याने सावधगिरीची गरज असली तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. रुग्णांच्या उपचारांसाठी पुरेशी आरोग्य व्यवस्था, उपकरणे, औषधे,

इंजेक्शन, प्राणवायू यांची सोय के ल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील व लोकांवर व्यवस्थित उपचार करता येतील. सर्वांनी आपल्या भागात याबाबत योग्यरीतीने काम होत आहे की नाही हे पाहावे.

तसेच वैयक्तिक संपर्क , खासगी दवाखान्यांकडील कोटा अशा विविध माध्यमांतून लशी मिळवून सार्वत्रिक लसीकरण मोहीम राबवावी, अशी सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्र्यांना केली.