Nissan Upcoming SUV : भारतीय बाजारात सध्या एसयूव्हीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अनेक कंपन्या शक्तिशाली फीचर्स असणाऱ्या एसयूव्ही लाँच करत आहेत. अशातच जर तुम्ही नवीन आणि शानदार एसयूव्ही खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा.
कारण भारतीय बाजारात लवकरच निसानची एसयूव्ही लाँच होणार आहे. या एसयूव्हीमध्ये कंपनी अनेक भन्नाट फीचर्स देणार आहे. तसेच या एसयूव्हीची किंमतही खूपच कमी असणार आहे, परंतु ही एसयूव्ही तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण ही कार भारतात कधी लाँच केली जाणार याची माहिती देण्यात आली नाही.
निसानची आगामी एसयूव्ही
नवीन पिढीची एसयूव्ही निसानच्या ई-पॉवर हायब्रिड पॉवरट्रेनसह जागतिक बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे. निसानच्या हायब्रीड सिस्टीममध्ये, ज्वलन इंजिन हे केवळ जनरेटर म्हणून काम करत असून ती ई-मोटर आहे जी चाके चालवते.
तसेच या कारमध्ये CMF-B प्लॅटफॉर्म हे EV ला सपोर्ट करण्यास सक्षम आहे, त्यामुळे काही मार्केटमध्ये पूर्ण-इलेक्ट्रिक मॉडेल उपलब्ध करून देण्याची शक्यता वर्तवली आहे. Renault आणि Nissan ने बाजारात नवीन गुंतवणुकीचा एक भाग म्हणून नवीन मॉडेल्स भारतीय बाजारात आणण्याची पुष्टी केली असल्याने भविष्यात नवीन Kicks भारतात येण्याची दाट शक्यता आहे.
किती आहे निसान एसयूव्हीची किंमत?
सध्या कंपनीकडून या कारच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. परंतु असे मानले जात आहे की कंपनी या कारला बाजारात 10 ते 12 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च केले जाऊ शकते. त्यामुळे जर तुम्हीही उत्तम कार घेण्याच्या विचारात असल्यास निसानची ही जबरदस्त कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल.