file photo

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- बेसूमार वाळू वाहतूकीमुळे पर्यावरणाबरोबरच आता सामाजिक प्रश्नही निर्माण झाले आहेत. कोल्हार ते बेलापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक झाल्यामुळे या रस्त्याची दुर्दशा झाली.

याकडे स्थानिक लोकप्रतिनिंधींनी दुर्लक्ष केले आहे. आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच जाब विचारावा लागेल, असे प्रतिपादन आमदार राधाकृष्ण विखे यांनी केले आहे. ते उक्कलगाव व गळनिंब येथे आले असता बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, सभापती संगिता शिंदे, दिपक पठारे, बाळासाहेब तोरणे, कल्याणी कानडे, हनुमान चिधे, चांगदेव भागवत, सरपंच शिवाजी चिंधे, उपसरपंच कविता भोसले, सदस्य अनिता शेरमाळे, सुलोचना मारकड, दत्तात्रय माळी,

बाळासाहेब वडितके, संपत चितळकर, शंकर वरखड, सोमनाथ चिंधे, गोपीनाथ जाटे, डाॅ. सुनिल चिंधे, अर्जुन बाचकर, गणेश देठे, आण्णासाहेब मारकड, नाना शिंदे, संजय शिंदे, आदी उपस्थित होते. विखे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून सामान्य माणसाला कोणत्याही अपेक्षा राहिल्या‍ नाही.

लोकांपासून हे सरकार दूर गेले असल्याची टीकाही विखेंनी केली. मागील दोन वर्षापासुन राज्य सरकारच‍या उदासीनतेमुळे सर्वच व्यवस्था ठप्प झाल्या आहेत. शेतकरी चिंतातूर असूनही वाळूमाफिया बिनधास्तपणे वावरत आहेत.

शेती मालाला सरकार भाव देवू शकले नसल्याने उत्पादित माल शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागला. सरकारला त्याची जाणीव नाही. युवकांनीच शेती आणि दुग्ध व‍यवसायात एकत्रित येवून काम केले करण्याचे आवाहन त्यांनी केले.

गळनिंब येथील सिध्देश्वर देवस्थानाचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश व्हावा, यासाठी आपण पाठपुरावा करू. गळनिंब येथे प्रवरा सहकारी बँकेचे विस्तार कक्ष सुरु करण्याबाबतही तातडीने कार्यवाही करण्याचे त्यांनी सांगितले.