Passport Download : आता घरबसल्याही करता येईल पासपोर्टसाठी अर्ज, त्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Passport Download : अनेकांना प्रवास करायला खूप आवडते. काही जण तर आपल्या कुटुंबांसोबत तर काहीजण आपल्या मित्रांसोबत दुसऱ्या देशात फिरायला जातात. परंतु, जर एका देशातून दुसऱ्या देशात जायचे असेल तर तुम्हाला पासपोर्ट अतिशय गरजेचा असतो.

पासपोर्ट नसेल तर तुम्हाला दुसऱ्या देशात जाता येत नाही. सरकारद्वारे पासपोर्ट हे नागरिकांना जारी करण्यात आलेले अधिकृत दस्तऐवज आहे. जर तुम्हाला पासपोर्ट साठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला कुठेही जावे लागणार नाही. कारण आता तुम्ही घरबसल्या पासपोर्ट साठी अर्ज करू शकता.

घरबसल्या करा पासपोर्टसाठी अर्ज

जर तुम्हाला एका देशातून दुसऱ्या देशात जायचे असल्यास तुमच्यासोबत पासपोर्ट असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही आता डिजिटायझेशनच्या काळात भारतीय पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता तुम्ही घरबसल्या काही सोप्या पद्धतींच्या साहाय्याने पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात अगोदर तुम्हाला पासपोर्ट सेवा केंद्र ऑनलाइन पोर्टलवर जावे लागणार आहे.
  • आता नवीन वापरकर्ता नोंदणीवर टॅप करा.
  • तपशील भरल्यानंतर रजिस्टर वर तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे.
  • त्यानंतर आता पुन्हा लॉगिन करा.
  • “नवीन पासपोर्टसाठी अर्ज करा/पासपोर्ट पुन्हा जारी करा” या लिंकवर जाऊन क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर असणाऱ्या फॉर्ममध्ये आवश्यक तपशील भरा आणि सबमिट करा.
  • त्यानंतर पुढची पायरी म्हणून, भेटीची वेळ निश्चित करण्यासाठी “सेव्ह केलेले/सबमिट केलेले अर्ज पहा” स्क्रीनवरील “पे आणि शेड्यूल अपॉइंटमेंट” लिंकवर क्लिक करा.
  • आता अर्जाचा संदर्भ क्रमांक (ARN)/ अपॉइंटमेंट क्रमांक असलेली अर्जाची पावती मुद्रित करण्यासाठी “प्रिंट अॅप्लिकेशन रिसीप्ट” लिंकवर जावे लागणार आहे.
  • हे लक्षात ठेवा की पासपोर्ट ऑफिसला भेट देताना अपॉइंटमेंट तपशीलांसह एसएमएस देखील भेटीचा पुरावा म्हणून स्वीकारला जातो.
  • सगळ्यात शेवटी, पासपोर्ट सेवा केंद्र/ प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला भेट देऊन जिथे मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष पडताळणीसाठी अपॉइंटमेंट बुक करण्यात येते.

ऑनलाइन पेमेंट असते बंधनकारक

सर्व PSKs/POPSKs/POs येथे अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी ऑनलाइन पेमेंट अनिवार्य केले आहे. तुम्ही आता क्रेडिट/डेबिट कार्ड (मास्टरकार्ड आणि व्हिसा), इंटरनेट बँकिंग (स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) असोसिएट बँका आणि इतर बँका) आणि एसबीआय बँक चलनाद्वारे पेमेंट करू शकता.