अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- स्थानिक गुन्हे शाखेने नगर शहरासह शेवगाव येथे कारवाई करून तब्बल १० लाख ९ हजार ८७० रूपयांचा गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू तसेच मावा जप्त केला. याप्रकरणी ११ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी जिल्ह्यात ही धडक कारवाई केली. राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा, पानमसाला व मावा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकले.

या कारवाईत १० लाख ९ हजार ८७० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.११ आरोपींविरुध्द विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात समीर मेहमूद सय्यद (वय ३५, रा. नेप्ती, ता. नगर), विजय विष्णू सब्बन (वय ३०, रा. दातरंगे मळा, नगर), राजू नारायण सब्बन (रा, बागडपट्टी, तोफखाना), रियाज रहिमबक्श तांबोळे (वय ५३, रा. पारशाखुट, नगर), राजू शामराव वराट (वय ३५, रा. निंबळक, ता. नगर),

अमोल नानासाहेब काळे (रा. रेणुकानगर, बोल्हेगाव), राजेंद्र पंढरीनाथ शिंदे (वय ३७, रा. घारतळे, बोधेगाव), लतीफ बाबा शेख (वय ४५, रा. भराट गल्ली, बोधेगाव), रम्मू बाबा शेख (वय ३९, रा. बोधेगाव), जमीर रशीद शेख (वय ३८, रा. बोधेगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.