Ola Electric Car : ‘या’ कंपनीने केली 500km रेंजच्या इलेक्ट्रिक कारची घोषणा, अवघ्या 4 सेकंदात पकडेल 100km चा स्पीड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ola Electric Car : ओला (Ola) लवकरच आपली पहिली इलेक्ट्रिक कार बाजारात (Market) दाखल करण्याच्या तयारीत आहे. चार्जिंग केल्यावर ही कार तब्बल 500 किमी धावेल असा कंपनीकडून दावा करण्यात आला आहे.

त्याचबरोबर ही कार अवघ्या चार सेकंदात 0 ते 100 किमीचा वेग पकडेल असाही कंपनीने दावा केला आहे. या कारचे वरचे छत हे पूर्णपणे काचेचे असून स्पोर्टी लूकमध्ये ही कार असणार आहे.

ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल (Bhavish Agarwal) म्हणाले, ही कार भारतातील आतापर्यंतची ‘स्पोर्टी कार’ (Ola Sporty Car) असेल. असा दावा करण्यात आला आहे की ओला इलेक्ट्रिक कारचे ड्रॅग गुणांक 0.21 असेल, म्हणजेच ते Kia EV6 पेक्षा जास्त वायुगतिकीय असेल, ज्याचा एरोडायनामिक ड्रॅग 0.28 असेल.

भाविश अग्रवाल यांनी कारच्या कामगिरीबाबत केलेले दावेही रोमांचकारी आहेत. सीईओ अग्रवाल यांनी दावा केला की आगामी ओला इलेक्ट्रिक कार 4 सेकंदात 0-100 किमी प्रतितास इतका वेग गाठण्यास सक्षम असेल.

पूर्ण सिंगल चार्ज (Single Charge) केल्यावर ही कार 500 किमी पेक्षा जास्त रेंज देईल असे त्यांनी सांगितले. असे झाल्यास ते केवळ भारतीय इलेक्ट्रिक कार्सच नाही तर अनेक युरोपियन इलेक्ट्रिक कारलाही रेंजच्या बाबतीत मागे टाकतील.

नवीन ओला इलेक्ट्रिक कारमध्ये असिस्टेड ड्राइव्ह टेक्नॉलॉजी, कीलेस ऑपरेशन आणि ओलाचे मूव्ह ओएस हे वैशिष्ट्य असेल. अग्रवाल यांनी सांगितले की, ही कार 2024 मध्ये लॉन्च केली जाईल.

विशेष म्हणजे ओलाची ही पहिली इलेक्ट्रिक कार असेल. सध्या कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर्सचे उत्पादन आणि विक्री करत आहे.