Ola Move OS3 : खुशखबर..! Ola ने सादर केले नवीन सॉफ्टवेअर अपडेट, मिळणार ‘हे’ फायदे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ola Move OS3 : Ola (Ola) ही देशातील इलेक्ट्रिक स्कूटर (Electric scooter) बनवणारी आघाडीची कंपनी आहे. दिवाळीच्या (Diwali) मुहूर्तावर Ola ने (Ola Electric Scooter) आपल्या वापरकर्त्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

Ola ने नुकतेच एक नवीन सॉफ्टवेअर (Ola software) अपडेट सादर केले आहे. या सॉफ्टवेअर अपडेटनंतर युजर्सना याचा चांगलाच फायदा होणार आहे.

काय विशेष असेल

ओलाने दिलेले सॉफ्टवेअर अपडेटमध्ये हायपरचार्जर नेटवर्कसोबतच यात कंपॅटिबिलिटी मोड, पार्टी मोड, मूड प्रॉक्सिमिटी अनलॉक यांसारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. पार्टी मोडमध्ये शिफ्ट होताच स्कूटरचे दिवे पार्टी मोडनुसार (Party mode) सेट होतील.

Proximity Unlocked बद्दल काय खास आहे

प्रॉक्सिमिटी लॉक आणि अनलॉक हे कंपनीने दिलेले एक उत्तम फीचर आहे. स्कूटरमध्ये नवीन सॉफ्टवेअर अपडेट झाल्यानंतर स्कूटर मॅन्युअली लॉक किंवा अनलॉक करण्याची गरज नाहीशी होईल.

अपडेट केल्यानंतर, तुम्ही स्कूटरजवळ जाताच ते अनलॉक होईल आणि तुम्ही दूर जाताच स्कूटर लॉक होईल. हे वैशिष्ट्य जगभरातील काही प्रीमियम बाइक्समध्ये उपलब्ध आहे. भारतीय बाजारात हे फीचर ओलाने आपल्या स्कूटरमध्ये दिले आहे. या फीचरचे पेटंटही कंपनीने घेतले आहे.

चार्जिंगचा वेग वाढेल

कंपनीने Move OS 3 अपडेटमध्ये आणखी एक उत्तम फीचर दिले आहे. हे फिचर हायपर चार्जिंगसह देण्यात आले आहे. अपडेटनंतर या फीचरच्या मदतीने स्कूटरला कमी वेळेत जास्त चार्ज करता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या फीचरच्या माध्यमातून स्कूटर फक्त एक मिनिट चार्ज करून तीन किलोमीटर चालवता येते. या फीचरसह स्कूटरला 15 मिनिटांसाठी चार्ज केल्यास स्कूटर 50 किमीपर्यंत चालवता येते.

व्हेकेशन मोड मिळवा

स्कूटरमध्ये नवीन सॉफ्टवेअर अपडेटमध्ये कंपनीने व्हेकेशन मोडही दिला आहे. हा मोड निवडल्यानंतर तुम्ही स्कूटर जास्त वेळ चालवली नाही तर स्कूटरच पॉवर वाचवते. या फीचरमुळे स्कूटरची पॉवर 200 दिवसांपर्यंत वाचवता येते. अशा परिस्थितीत जर तुम्ही घराबाहेर जात असाल तर परत आल्यानंतर तुम्हाला स्कूटर चार्ज करण्याची गरज भासणार नाही.