अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन अहमदनगर च्यावतीने रक्षाबंधन कार्यक्रम डीएसपी ऑफिसमध्ये घेण्यात आला. लायन्स क्लबचे अध्यक्षा ला. संपूर्णा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली हा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला.

लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष ला.श्रीकांत मांढरे, ला.कल्पना ठुबे, ला.सविताताई मोरे, ला. छायाताई रजपूत, ला. मंदाकिनी वडगणे, ला. सुरेखाताई कडूस यांनी पोलिस अधिक्षक मनोज पाटील व ग्रामीण विभाग पोलीस ऑफीसर पाटील आदिंसह पोलीस बांधवांना राखी बांधून औक्षण करण्यात आले.

याप्रसंगी अध्यक्षा संपूर्णा सावंत यांनी लायन्स क्लबच्यावतीने राबविण्यात येणार्या विविध उपक्रमाची माहिती दिली. लायन्स क्लबने गेल्या 52 दिवसांमध्ये लायन्स क्लबच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आल्याचे सांगितले.

यामध्ये ग्रामीण भागामध्ये व शाळेमध्ये मेडिकल कॅम्प व शिक्षक दिन आदि कार्यक्रमांची रुपरेषा सांगितली. याप्रसंगी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी लायन्स क्लबतर्फे नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात,

या उपक्रमातून समाज प्रबोधन होत असल्याने या स्तुत्य उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी क्लबचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मांढरे यांनी क्लबच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. प्रसाद मांढरे यांनी सर्वांचे आभार मानले.