मांसाहाराच्या जाहिरातींवर बंदीसाठी याचिका, न्यायालय म्हणाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News:मांसाहारबद्दल विविध माध्यमांवर जाहिराती करण्यास बंदी घालण्यात यावी. यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे घालून देऊन मांसाहार करणे हे आरोग्यासाठी घातक आहे,

असे नमूद करूनच जाहिराती देण्याचे बंधन घालावे, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. आत्मकमल लब्धीसुरीश्वरजी जैन ज्ञानमंदिर ट्रस्टने ही जनहित याचिका केली होती.

न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे. न्यायालयाने म्हटले की, कोणताही कायदा, नियम करणे जे सरकारचे व विधिमंडळाचे काम आहे. ते कोर्टाच्या अखत्यारीत येत नाही.

त्यामुळे ही जनहित याचिकाच सदोष आहे. कोणाच्या हक्कांचे उल्लंघन होत असेल, कायद्याचे, कायदेशीर प्रक्रियेचे पालन होत नसेल तरच न्यायालय हस्तक्षेप करू शकते. असे म्हणत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळली.