PM Ujjwala Yojana New Registration : आता यांनाही मिळणार मोफत LPG सिलिंडर, उज्ज्वला योजनेत नवीन अर्ज सुरू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Ujjwala Yojana New Registration : केंद्र सरकारने (Central Govt) 1 मे 2016 पासून ‘उज्ज्वला योजना’ (Ujjwala Yojana) सुरू केली आहे. या योजनेतून गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन (Free gas connection) दिले जाते.

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्ही घरबसल्या अर्ज (Application) दाखल करू शकता. केंद्र सरकारने या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी हेल्पलाइन आणि टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत.

आजही आपल्या देशात अनेक गरीब कुटुंबे आहेत ज्यांच्याकडे एलपीजी कनेक्शन (LPG connection)  नाही. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली आहे. पीएम उज्ज्वला योजनेअंतर्गत, सरकार दारिद्र्यरेषेखालील लोकांना एलपीजी गॅस कनेक्शन पुरवते. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिला अर्जदाराचे वय 18 वर्षे असावे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

तसेच, जर या योजनेअंतर्गत अर्जदार महिलेच्या कुटुंबाकडे आधीच एलपीजी कनेक्शन असेल, तर ती यासाठी पात्र असणार नाही. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन गॅस स्टोव्ह आणि भरलेले सिलिंडर दिले जाते.

तसेच, सरकार पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना पहिले रिफिल मोफत पुरवते. ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहकार्याने चालवली जात आहे.

पीएम उज्ज्वला योजना हेल्पलाइन

हेल्पलाइन क्रमांक-1906
टोल फ्री क्रमांक – 18002666696

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करा

  • सर्वप्रथम pmuy.gov.in या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • येथे तुम्ही तुमच्या सोयीनुसार इंडेन, भारत गॅस आणि एचपी एलपीजी यापैकी निवडू शकता.
  • त्यानंतर सर्व तपशील काळजीपूर्वक भरा.
  • तुम्ही पीएम उज्ज्वला योजना फॉर्म देखील डाउनलोड करू शकता.
  • त्यानंतर ते भरून तुमच्या घराजवळील गॅस एजन्सीमध्ये जमा करा.
  • कागदपत्र पडताळणीनंतर तुम्हाला एलपीजी गॅस कनेक्शन दिले जाईल.

पीएम उज्ज्वला योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत कनेक्शनसाठी, अर्जदाराचे ई-केवायसी आवश्यक आहे.
  • बीपीएल शिधापत्रिका किंवा राज्य सरकारने जारी केलेले शिधापत्रिका, ज्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील असल्याचा पुरावा आहे.
  • आधार कार्ड, मतदार ओळखपत्र अनिवार्य आहे.
  • बँक खात्याचा तपशील आवश्यक आहे.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत ठेवा.

9 कोटींहून अधिक लोकांना मोफत LPG गॅस सिलेंडर कनेक्शन मिळाले

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत, सरकार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना घरगुती एलपीजी कनेक्शन पुरवते. या PM उज्ज्वला योजनेंतर्गत देशातील APL, BPL आणि शिधापत्रिकाधारक महिलांना भारत सरकारकडून मोफत गॅस कनेक्शन दिले जाते.

या PM उज्ज्वला योजनेअंतर्गत आतापर्यंत 9 कोटी लोकांना मोफत LPG कनेक्शन मिळाले आहेत. इंडियन ऑइलने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.

सबसिडी फक्त प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत उपलब्ध असेल

सध्या दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1,003 रुपये आहे. जे पीएम उज्ज्वला योजनेचे  लाभार्थी आहेत, त्यांना सध्याच्या 803 रुपयांच्या किंमतीनुसार एलपीजी सिलिंडर मिळेल.

पीएम उज्ज्वला योजनेच्या या लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात 200 रुपये सबसिडी पाठवली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2016 रोजी ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली.