file photo

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-  तालुक्यातील ब्राम्हणी परिसरात तीन गोठ्यातील गायींना वालिस खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.सदर जनावरावर पुढील उपचार सुरू आहे.त्यासाठी मोठा खर्च होत आहे.परिणामी पशुपालक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

याशिवाय दैनंदिन दुधात मोठी घट झाली आहे. विशेष म्हणजे सदर वालीस एक नामांकित कंपनीच आहे. ज्या वालीसाला पशुपालक शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी आहे. त्याच वालीसा मधून सदर प्रकार घडला असल्याने मोठी भीती व्यक्त केली जात आहे.

आधीच पशुपालक अडचणीत असताना वालिसा मधून विषबाधा होत असल्याने पशुखाद्य म्हणून वालीस चारावे की नाही असा प्रश्न पडला आहे. या प्रकरणी सबंधित दुकानदार विक्रेते व कंपनी या प्रकरणी काय भूमिका घेणार? याकडे आता पशुपालक शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

गोठ्यातील २० लहान-मोठ्या जनावरांना विषबाधा झाली.उपचार सुरू आहे.दर अर्ध्या तासाला स्प्रे द्यावा लागतो.४०-५० हजार रुपये खर्च आला.पुढे काय ? याची धास्ती कायम असल्याचे पशुपालक अजित बानकर यांनी सांगितले. ब्राम्हणी व चेडगाव परिसरातील दोन गोठ्यातील जनावरांचा समावेश आहे.

मोठ्या प्रमाणात वालिस् देण्यात आलेल्या जनावरांना याचा त्रास अधिक झाला.दरम्यान दूध कमी झाले. तर, कमी वालीस देण्यात आलेल्या गायींना त्रास कमी झाला. पशुपालकांनी वालीस चारताना काळजी घ्यावी.काही लक्षणे दिसून आल्यास लगतच्या पशुवैद्यकीय सेवकांना कळवावे असे आवाहन डॉ.हर्षद इनामदार यांनी केले आहे.