अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- नगर तालुका पोलिसांनी बेकायदेशीर दारु विक्री होत असलेल्या ठिकाणांवर छापे टाकून मुद्देमाल जप्त करत दारु विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली आहे.

नगर तालुका पोलिस स्टेशनचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाने पोहेकॉ लगड ,पोहेकॉ सरोदे, व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दि.10 ऑगस्ट रोजी नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील शिवार हॉटेल पाटील च्या पाठीमागे संतोष बबन ठोंबरे हा व्यक्ती विनापरवाना देशी विदेशी दारु बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगताना आढळला .

पोकाँ ज्ञानेश्वर खिळे यांच्या फिर्यादीवरून सदर व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच चिचोंडी पाटील शिवार हॉटेल साईगणेशच्या पाठीमागे बाळासाहेब मंजाबापू तनपुरे हा व्यक्ती देशी विदेशी दारू बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगताना आढळला .

पोकाँ विशाल टकले यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात सदर व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.