अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर गुन्हा अन्वेषन विभागाच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात हजार रुपये रोख व जुगाराचे साहीत्य जप्त करण्यात आले असुन सात जणाविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बेलापुर येथील लक्ष्मी नारायण नगरच्या बाजुला आडोशाला काही इसम तिन पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहि गुन्हा अन्वेषण विभागाला समजली.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, हवालदार मनोज गोसावी, हवालदार सुनिल चव्हाण, हवालदार दत्ता ईंगळे, अंमलदार रणजीत जाधव, सागर ससाणे, बबन बेरड यांच्या पथकाने छापा टाकला.

संबंधित ठिकाणी सात इसम तिन पत्त्याचा तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले. पोलीसांनी जुगाराचे साहित्य सात हजार रुपये रोख जप्त केले असुन सात जणाविरुध्द जुगार अँक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.