file photo

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :-कौटुंबिक कलहाच्या नैराश्येतून पोस्टमन असलेल्या व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना पारनेर तालुक्यातील वाळवणे येथे घडली आहे.

राजेश संपत ढवळे (वय 39, रा. वाळवणे, ता. पारनेर) असे आत्महत्या करणार्‍या युवकाचे नाव आहे. वाळवणे येथे पोस्टमन म्हणून तो कार्यरत होता.

याबाबत अधिक माहिती अशी कि, राजेशने राहत्या घरी पलंगावर उभे रहात दोरीच्या साह्याने छताला गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

याबाबतची माहिती सुपा पोलीस स्टेशनला कळताच सुपा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

शवविच्छेदन केल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. दरम्यान, ढवळे यांनी घरातील कौटुंबिक कलहास कंटाळून नैराश्यातून हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद सुपा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.