ताज्या बातम्या

PPF Scheme Big Update : गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! सरकारने केली अशी घोषणा की ऐकून बसला करोडो लोकांना धक्का

PPF Scheme Big Update : अनेकजण सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत गुंतवणूक करत असतात. या योजनेत सध्या 7.1 टक्के व्याज मिळत आहे. इतकेच नाही तर जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुमच्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध होते.

अशातच आता केंद्र सरकारकडून अल्पबचत योजनेत पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारने नवीन व्याजदराची घोषणा केली आहे.

कोणत्या योजनेत किती व्याज मिळेल? जाणून घ्या

1. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर 8 टक्क्यांवरून 8.2 टक्के इतका केला आहे.
2. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट वरील व्याजदर 7 टक्क्यांवरून 7.7 टक्के इतका केला आहे.
3. सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर 7.6 टक्क्यांवरून 8 टक्के इतका केला आहे.
4. किसान विकास पत्रावरील 7.2 (120 महिने) वरून 7.5 (115 महिने) पर्यंत वाढविले आहे.

500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक

तुम्हाला आता किमान 1 वर्षात PPF मध्ये 500 रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येत आहे. समजा तुम्ही PPF मध्ये 1 वर्षात 1.5 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला त्यात कर सवलतीचा लाभ मिळू शकेल. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यात प्रत्येक महिन्याला पैसे जमा करू शकता

इतक्या वर्षांनंतर बंद होते गुंतवणूक

या योजनेतील गुंतवणूक ही 15 वर्षानंतर थांबली जाते परंतु जर तुम्हाला यात जास्त गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही 15 वर्षांनंतरही या योजनेत गुंतवणूक करू शकता. त्यानंतर तुम्ही या योजनेत वर्षातून एकदाच पैसे काढू शकता. .

कर्जाची सुविधा उपलब्ध होते

केंद्र सरकार आता तुम्हाला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील व्याजाचा लाभ देत आहे. इतकेच नाही तर पीपीएफ खात्यावर तुम्ही सहज कर्ज मिळवू शकता. तुम्हाला तुमच्या PPF खात्यातील 25% रक्कम कर्ज मिळू शकते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts