अंत्यवीधीस विरोध करणाऱ्या प्रवृत्तीचा आरपीआयच्यावतीने निषेध

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- मातंग समाजातील व्यक्तीच्या अंत्यविधीस विरोध करणाऱ्या प्रवृत्तीचा राहुरी येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलाय.

तसेच तसेच जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व तालुकाध्यक्ष विलासनाना साळवे यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आणि या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे.

अशी मागणी करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील माळवाडी येथे मातंग समाजाचे सरपंच दशरथ साठे यांच्या भावाचे दिनांक 20 ऑगस्ट रोजी निधन झाले होते. परंतु गावातील जातीयवादी गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी त्यांचा अंत्यविधी स्मशान भूमीत करण्यास विरोध केला. अंत्यविधी करू दिला नाही.

परिणामी मयताची विटंबना करून माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. गावकऱ्यांनी विरोध केल्याने साठे यांच्या नातेवाईकांनी सदर अंत्यविधी तेथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात केला. याविषयी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद असून संपूर्ण महाराष्ट्रात या संतापजनक घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

अशा जातीयवादी प्रवृत्तींना कायद्याने जरब बसण्याकरिता व स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी नंतरही समाजातील जातिवाद नष्ट होत नसल्याची मानसिकता यातून स्पष्ट होत आहे. शासनाने याकडे लक्ष वेधत अशा घटना घडू नये, याकरिता कठोर उपाययोजना करावी.

या घटनेचा राहुरी येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करून संबंधित व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली. आरोपींवर कठोर शासन न झाल्यास राज्यभर आरपीआयच्या वतीने आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन छेडले जाईल.

असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, तालुका अध्यक्ष विलासनाना साळवे, उपाध्यक्ष सुनील चांदणे, सचिन डहाणे, राजू दाभाडे, रॉबर्ट सँमूवेल,

संतोष दाभाडे, मयूर सूर्यवंशी, अजय जाधव, राजेंद्र शिरसाठ, भाऊसाहेब साळवे, सचिन सगळगीळे, नवीन साळवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सीमा बोरुडे, तालुकाध्यक्ष स्नेहल सांगळे, उप तालुकाध्यक्ष छाया दुशिंग, आदींच्या सह्या आहेत.