नगर तालुक्यातील या गावात जनता कर्फ्यू !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- नगर तालुक्यातील मांडवे येथे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बुधवार दि.१९ पासून ते शनिवार दि.२९ पर्यंत ग्रामपंचायतीने जनता कफ्र्यू पुकारला आहे.

या अंतर्गत कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती सरपंच सुभाष निमसे यांनी दिली. मांडवे गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

सद्यस्थितीत सक्रीय रुग्णांची संख्याही काळजी वाढविणारी आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने गावामध्ये जनता कफ्र्यू पुकारला आहे.

जनता कफ्र्यू दरम्यान नागरिकांनी सर्व आदेशाचे पालन करण्याचे आवाहन सरपंच सुभाष निमसे, उपसरपंच संजय रामदास निमसे, ग्रामपंचायत सदस्य शाम निमसे, संतोष निमसे, अरुण निमसे, प्रकाश निकरड, मनोज गागरडे, महेंद्र निक्रड, दिलीप निक्रड व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.

गावातील सर्व रस्ते बांबू लावून बंद करण्यात आले आहेत. वैद्यकीय सेवा, मेडिकल पूर्ण वेळ, घरपोच गॅस वितरण सेवा, सर्व मान्यताप्राप्त आर्थिक आस्थापना ( बँक, पतसंस्था, सेवा सोसायटी), दूध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी व विक्री सकाळी ७ ते ८ सुरू राहणार आहे.

तर, किराणा दुकाने, भाजीपाला, फळे, चिकन, अंडी, मटण, इतर मांसाहारी पदार्थ खरेदी व विक्री, सर्व खासगी आस्थपना बंद राहणार असून खाद्यपदार्थ फेरीवाले यांना मनाई करण्यात आली आहे. मांडवे ग्रामपंचायतीने जनता कफ्र्यू पुकारण्याचा घेतलेल्या निर्णयाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.