file photo

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- सोमवारपासून शहर व जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारीही सायंकाळनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली.

त्यामुळे खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला आहे. २४ तासांत १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.भंडारदरा, मुळा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. नगर शहर व जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यानंतर मात्र जुलै महिना कोरडा गेला.

त्यामुळे खरीपावर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे खरिपातील पिके जळण्याच्या मार्गावर होती.मात्र सोमवारी रात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवारी रात्रभर नगर शहर व जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरूच होती.

मंगळवारी सायंकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. नगर जिल्ह्यात पाऊस आला सुरुवात झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर गेल्या काही दिवसापासून कायम आहे.

त्यामुळे भंडारदरा व मुळा या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या २४ तासात नगर १०, पारनेर ७, श्रीगोंदे १४,कर्जत ३,जामखेड ७, शेवगाव १४, पाथर्डी २४, नेवासे १४, राहुरी २३, संगमनेर ७, अकोले ५१, कोपरगाव १४, श्रीरामपूर २१ व राहता १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नगर जिल्ह्यात जून ते जुलै या कालावधीत १२७ टक्के पावसाची नोंद झाली होती तर ऑगस्ट महिना अखेरपर्यंत ३१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.