‘महावीर क्रिकेट लिग’चा राज रॉयल्स मानकरी सोशल मिडियाच्या जमान्यात युवकांना मैदानाकडे वळविण्याची गरज – विक्रम राठोड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-  महावीर ग्रुप व श्री महावीर प्रतिष्ठान (ट्रस्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महावीर क्रिकेट लिग’च्या अंतिम सामना राज रॉयल्स विरुद्ध युसीसी मध्ये झाला.

या अटीतटीच्या सामान्यात राज रॉयल्स संघांच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत विजयी ठरले. विजेत्या संघास युवा सेनेचे विक्रम राठोड यांच्या हस्ते चषक देण्यात आला. याप्रसंगी महावीर ग्रुपचे राजेश भंडारी, कमलेश भंडारी, सचिन कटारिया, डॉ.सचिन भंडारी,

प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षल बोरा, सचिन लुणिया, राकेश भंडारी, परेश बोगावत, अमित फिरोदिया, स्वनिल मुनोत, पुष्कर तांबोळी, श्रीपाल शिंगी, आनंद मुनोत, आशिष चोपडा, निखिल गांधी आदि उपस्थित होते. याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले, स्पर्धेमुळे खिलाडूवृत्ती निर्माण होऊन सांघिकपणा तयार होतो.

अशा स्पर्धांचे नियमित आयोजन होणे गरजेचे आहे. सध्याच्या मोबाईल व सोशल मिडियाच्या जमान्यात युवकांना मैदानाकडे वळविण्याची आवश्यकता आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी हे गरजेचे झाले आहे. महावीर प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा आदि क्षेत्रात अग्रेसर राहून सामाजिक दायित्व जपत आहे.

त्यांच्या कार्यास आपले नेहमीच सहकार्य राहील, असे सांगितले. याप्रसंगी कमलेश भंडारी, राजेश भंडारी आदिंनीही मनोगत व्यक्त केले. प्रतिष्ठानचे सचिन लुणिया यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. स्पर्धेतील पारितोषिक विजेते पुढीलप्रमाणे : विजेता संघ – राजय रॉयल्स,

उपविजेता-यु.सी.सी., तृतीय – एम.सी.सी. सर्वोत्तम गोलंदाज – यश कटारिया, सर्वोत्तम फलंदाज – हर्ष दिवाणी, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक – अंकित कोठारी, मालिकावीर – प्रणव पल्लोड. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.