राम शिंदे झाले आक्रमक म्हणाले ठाकरे सरकार टाईमपास सरकार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :-  ओबीसींचे राजकीय आरक्षण, मराठा आरक्षण संपवणार्‍या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या भाजपा ओबीसी मोर्चा वतीन आज सकाळी सक्कर चौक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

भाजपच्या वतीने राज्यभर रास्तारोको आंदोलन करण्यात आले नगरमध्ये प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे यांचे नेतृत्वाखाली सक्कर चौक येथे हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, महापौर बाबासाहेब वाकळे,

ओबीसी चे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे ,शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड.अभय आगरकर, जेष्ठ नेते वसंत लोढा, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, दिलीप भालसिंग, संतोष म्हस्के, अ‍ॅड.युवराज पोटे,

सचिन पारखी, अक्षय कर्डीले, सुनील रामदासी आदी सह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. उपस्थित होते. ओबीसीचे घटनेने दिलेले आरक्षण काढून घेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारमुळे झाले.

महाविकास आघाडीने योग्य ती बाजू सुप्रीम कोर्टात मांडली नाही त्यामुळे ओबीसी चे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. जोपर्यंत ओबीसीचे आरक्षण पुनर्स्थापित करत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होता कामा नये असा इशारा माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी दिला.

ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी भाजपच्या वतीने शनिवारी (दि. २६) शहरातील सक्कर चौकात सकाळी दहा वाजता चक्का जाम आंदोलन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री शिंदे पुढे म्हणाले,

आरक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे काम ठाकरे सरकारने केले. हे सरकार टाईमपास सरकार आहे. कोणीच कोणाचं ऐकत नाही हा या तीन पक्षाच्या सरकारचा समान कार्यक्रम आहे.

सगळा बट्ट्याबोळ गेल्या पंधरा महिन्याच्या कालावधीत करून ठेवला आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी भाजपा मैदानात उतरून लोकांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने चक्का जाम आंदोलन छेडत आहे.