अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-  मानवहित लोकशाही पक्षाच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी रामदास साळवे यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष रावसाहेब पवळे यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली रामदास साळवे यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी क्रांतिगुरु लहुजी महासंघाचे राज्य संपर्कप्रमुख सचिन नवगिरे, पक्षाचे सोशल मीडिया जिल्हाप्रमुख मच्छिंद्र कसबे, रॉयल शिंदे, बाबासाहेब दिनकर, अनिल वैरागर, आरपीआयचे अविनाश उमाप, मारुती वैरागर, खरवंडी ग्रामपंचायत सदस्य युसुफभाई बागवान, सलीम बागवान,

रवी शिरसाठ, मच्छिंद्र पवळे, अरुण पवळे, रवी पवार, वसंत खेडेकर, रतन सकट, नितीन गायकवाड आदींसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी माजी जिल्हाध्यक्ष दिवंगत दिलीप पवळे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पक्षप्रमुख तथा राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल सरोदे यांच्या सूचनेनुसार रामदास साळवे यांची निवड करण्यात आली. प्रसंगी जिल्हाध्यक्ष रावसाहेब पवळे म्हणाले की, मानवहित लोकशाही पक्ष हा तळागाळातील सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष असून शिवराय-फुले-शाहु-आंबेडकर- साठे आणि मानवमुक्तीच्या लढ्यातील महापुरुषांच्या विचाराने काम करणारा पक्ष आहे.

पीडित, उपेक्षित, वंचीत, दुर्बल घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे. रामदास साळवे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना रामदास साळवे यांनी सांगितले की,

पदाच्या माध्यमातून तळागाळातील समाजाच्या उन्नतीसाठी सामाजिक प्रश्नासाठी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करील. पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे, सर्वांना बरोबर घेऊन ती आपण पूर्ण करु असे सांगितले.

यावेळी सचिन नवगिरे यांनी दिवंगत पवळे यांच्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर मच्छिंद्र कसबे यांनी सर्वांचे आभार मानले.