file photo

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्याने संगमनेर शिवसेनेने आक्रमक होत, मंगळवारी बस स्थानकासमोर आंदोलन केले. राणे विरोधी घोषणाबाजी व प्रतिमेला जोडे मारत बस स्थानकातील शौचालयाचे राणे असे नामकरण केले.

तर सुव्यवस्था भंग करणाऱ्या राणेंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. सहायक पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी निवेदन स्वीकारले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरणारे केंद्रीय मंत्री राणे यांच्या विरोधात मंगळवारी राज्यभर आंदोलन सुरू होते.

या पार्श्वभूमीवर संगमनेर शिवसेनेने बसस्थानकासमोर सकाळी जमा होत, राणे विरोधी घोषणाबाजी केली. राणेंवर कडाडून टीका करण्यात आली. बस स्थानकातील शौचालयाकडे मोर्चाने जात राणे असे नामकरण केले. शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी, संपर्क प्रमुख नरेश माळवे, कार्याध्यक्ष दिपक साळुंके,सचिव प्रथमेश बेल्हेकर, पप्पू कानकाटे, अशोक सातपुते,

जयवंत पवार, युवासेनेचे अमोल कवडे, अमोल डुकरे, ज्ञानेश्वर कांदळकर, अमित चव्हाण, भिमाशंकर पावसे, रमेश काळे, वेणुगोपाल लाहोटी, संजय फड, दिलीप पावसे, राजू सातपुते, किरण सानप, प्रसाद पवार, सचिन साळवे, शीतल हासे, आसिफ तांबोळी, मुजीब शेख, अनुप म्हाळस, दीपक वमन, माधव फुलमाळी, विकास डमाळे, दत्तू नाईक, रुपेश धाकतोडे, सदाशिव हासे, बबन सातपुते, रवी गिरी आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कायम शिवसेनेबद्दल घाण ओकल्याने त्यांचे नाव शौचालयाला देण्यात आल्याचे शहरप्रमुख अमर कतारी यावेळी म्हणाले. घोषणाबाजीने नागरिकांचे व प्रशासनाचे लक्ष वेधले. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता.